Type Here to Get Search Results !

वाढत्या अपघातांमुळे राहुरीचे नागरिक भडकले ; उद्या राहुरीत मोठे आंदोलन

वाढत्या अपघातांमुळे राहुरीचे नागरिक भडकले ; उद्या राहुरीत मोठे आंदोलन



राहुरी ( प्रतिनिधी )

 नगर मनमाड रस्त्यावर होत असलेल्या अपघातबाबत सरकारला जाब विचारण्याकरिता उद्या सोमवार दि. 8 रोजी सकाळी १० वाजता 


 

माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन तहसील कार्यालय राहुरी येथे करण्यात आलेले आहे.


                     ( हा व्हिडीओ नक्की पहा  ... ) 

गेल्या मोठ्या कालखंडापासून नगर मनमाड महामार्ग एन एच ए आय क्रमांक 160 एक पूर्णपणे उखडला असून या महामार्गावर गेल्या आठवड्याभरात पाच जणांचा बळी गेला आहे .



 ( राहुरीत आंदोलनात का यायचे ते पहा या व्हिडिओ मध्ये... )

महामार्गावरील मोठ्या खड्ड्यांमुळे लॉजिस्टिक मालवाहतूक करणारे वाहने वाहन चालकांचा विचार न करता खड्डे चुकवत बेफाम वाहने चालवत आहेत . ठिकठिकाणी असणाऱ्या वाहतूक पोलीस व पोलीस व्यवस्थेचेही याकडे दुर्लक्ष आहे .

 मोठ्या प्रमाणात वाहन चालकांचा बळी जात आहे यामुळे राहुरीतील नागरिक केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या या भोंगळ कारभारामुळे संतप्त झाला असून उद्या राहुरी तहसील कार्यालय येथे मोठे आंदोलन होणार आहे .



      

  नगर मनमाड रस्त्यावर होत असलेल्या अपघात बाबत सरकारला जाब विचारण्याकरिता उद्या सोमवार दि.८ रोजी सकाळी माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन तहसील कार्यालय राहुरी येथे करण्यात आलेले आहे. उद्या राहुरीत होणाऱ्या मोठ्या आंदोलनात विविध पक्ष संघटना ंच्या प्रतिनिधींसह नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत . नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे .

Post a Comment

0 Comments