Type Here to Get Search Results !

पाण्याच्या आंदोलनकर्त्यांवर खटला ;13 वर्षानंतर लागला निकाल - निर्दोष मध्ये राजकीय नेते , सामाजिक कार्यकर्ते

पाण्यासाठी आंदोलनकर्त्यांवर खटला ; 13 वर्षानंतर लागला निकाल - निर्दोष मध्ये राजकीय नेते , सामाजिक कार्यकर्ते



राहुरी   ( प्रतिनिधी )

2012 मध्ये जायकवाडीला पाणी सोडावे लागले होते . यावेळी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते .



यावेळी जायकवाडी धरणाचे पाणी बंद करून राहुरी तालुक्यातील डावा कालवा तसेच उजवा कालवा पाणी सोडण्याचे काम राहुरीच्या हितासाठी तत्कालीन व विद्यमान राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले , माजी खासदार बापूसाहेब तनपुरे , कै. शिवाजीराव गाडे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी पाण्याचा विषय हा महत्त्वाचा होता यावेळी आंदोलकांना अटक झाली होती .

गेल्या गेली तेरा वर्ष हा खटला अहिल्यानगर येथील जिल्हा सत्र न्यायालयात चालला आणि अहिल्यानगर जिल्हा सत्र न्यायाधीश शेख साहेब यांनी निर्दोष मुक्ताता केली . 

याप्रसंगी  ॲड महेश तवले वकील , ॲड जालिंदर टाकते , यांनी कामकाज पाहिले . 

यातून तत्कालीन व विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले , माजी खासदार बापूसाहेब तनपुरे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, रविंद्र मोरे , रावसाहेब यादवराव तनपुरे , सिताराम भाऊ ढुस , आसाराम भाऊ ढुस , प्रा चांगदेव भोंगळ , सोन्याबापू जगधने , डॉ जयंत कुलकर्णी, डॉक्टर धनंजय मेहेत्रे, अण्णासाहेब बाचकर , तानाजी ढसाळ, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, नितीन तनपुरे, सर्जेराव घाडगे , सूर्यभान गाडे, प्रवीण लोखंडे, दत्ता जोगदंड, विजय डौले , शहाजी कदम, तसेच इतर आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली . त्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे .

Post a Comment

0 Comments