राहुरी पब्लिक स्कूलमध्ये अनुभव घेतलेले 750 माजी विद्यार्थी त्याच बंद पडलेल्या शाळेत आल्यावर काय झालं ते माजी विद्यार्थी नवनीत दरक यांच्या लेखनातून....
सतर्क खबरबात जिल्ह्याची - स्पेशल रिपोर्ट
१२ ऑक्टोबर २०२५ श्री शिवाजी विद्यानिकेतन श्रीशिवाजीनगर (RPS) एक अशी शाळा जी आज बंद अवस्थेत आहे. या शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी संवेदनम् २०२५ आपली शाळा आठवणींचा मेळावा आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना आणि प्रतिज्ञा करून झाली. ७५० माजी विद्यार्थी तसेच आमचे आदरणीय गुरूवर्य ज्यांनी आम्हास शिस्तीचे धडे दिले आणि त्यामुळे कार्यक्रम पत्रिकेच्या वेळेप्रमाणे सर्वांनी शिस्त पाळली.
अनोख्या ऐतिहासिक कार्यक्रमाची सर्वात जमेची बाजू म्हणजे कुठलाही सत्कार नाही मंचावर कुणीही पाहुणा नाही कुणाचेही मनोगत नाही अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आली.
सर्व बॅचेस (३०) एकएक करून ग्रुप ने मंचावर जाऊन त्यांची ओळख करून दिली हे सर्व होत असताना अक्षरशः भावना दाटून येत होत्या. त्यानंतर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून शाळेच्या १९७३ स्थापने पासून सर्व फोटोज् सादर करण्यात आले.
यामध्ये माजी विद्यार्थ्याने त्यांच्या कंपनीतील १० लकी ड्रॉ गिफ्ट्स ची कल्पना साकारली .
त्यानंतर गुरुवर्य आणि सिनिअर बॅचेस क्रमवारीनुसार २०० च्या संख्येने जेवणासाठी अगदी कुठलीच घाई न करता शिस्तबद्ध पद्धतीने सात्विक शाळे प्रमाणेच जेवणाचा आस्वाद घेतला.
दुपारच्या सत्रामध्ये प्रो.जगदाळे सर यांनी त्यांच्या व्याख्यानातून सर्वांच्या शाळेबद्दलच्या भावनेत अगदी अलगद उत्पत्तीत केल्या.
डॉ बा बा तनपुरे सह साखर कारखान्याचे तसेच शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अरुणरावजी तनपुरे व संचालकांनी तिथे शाळेच्या प्रोटोकॉल प्रमाणे एन्ट्री करून स्थानापन्न झाले व सर्व माजी विद्यार्थ्यांचे मनोगत एकएक करून अगदी शिस्तबद्ध पद्धतीने समजावून घेतले.
५० हून अधिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना त्याच आणि तशाच बोर्डिंग स्कूल पुनर्जीवित करावी व त्यासाठी आम्ही सर्व देखील सर्व प्रकारच्या योगदानात समभाग घेऊ तुम्ही फक्त आमचे बालपण आमच्या आठवणी आमची शाळा तशाच वैभवात सुरू करावी.
१९७३ साली ज्यांनी या शाळेची पायाभरणी केली त्यांचे शिक्षण नव्हते पण ग्रामीण भागातील मुल शैक्षणिक तसेच क्रीडा या दोन्ही गोष्टींमध्ये जगाच्या स्पर्धेत मागे राहता कामा नये या संकल्पनेतून सुरुवात केली.
आज याच शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी अगदीच १४ सप्टेंबर रोजी social मिडिया द्वारे आवाहन केल्या तारखेपासून अवघ्या २६ दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या ३५ जिल्ह्यातून ७५० ची फौज उभी करण्यात यशस्वी झाले.
मळीचा वास आजही नाकात आहे आणि साहेबांना आवाहन करताना तो मळीचा वास आम्हाला घ्यायला नक्कीच आवडेल अशा पद्धतीने देखील आवाहन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थी आयुष्याच्या ज्या काही शिखरावर आहेत त्यांना गाडीघोडे पैसेआडके यांचे कौतुक नसून समाधान नक्कीच जास्त आहे आणि हेच समाधान मानण्याची वृत्ती याच पंढरीने प्राप्त करून दिली आहे.
माननीय श्री अरुण साहेब यांनी त्यांच्या संबोधनातून शाळा पुनर्जीवित करताना बोर्डिंग स्कूल च असेल आणि लवकरच त्याचे काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन अगदी भावनिक होऊन दिले.
संवेदनम् २०२५ या माजी विद्यार्थी मेळावा संध्याकाळच्या चहा बिस्कीट करून सांगता झाली.
Post a Comment
0 Comments