Type Here to Get Search Results !

प्रेरणा अर्थ परिवारातील तिन्ही संस्थांची संस्थापक सुरेशशेठ वाबळे यांच्या दूरदृष्टीने 25-30 वर्षांपासून यशस्वी वाटचाल

प्रेरणा अर्थ परिवारातील तिन्ही संस्थांची संस्थापक सुरेशशेठ वाबळे यांच्या दूरदृष्टीने 25-30 वर्षांपासून यशस्वी वाटचाल



राहुरी  (  प्रतिनिधी )

माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या मार्गदर्शना खाली प्रेरणा अर्थ परिवारातील तिन्ही संस्था मग त्यात प्रेरणा पतसंस्था ३२ वर्षा पासून, प्रेरणा मल्टिस्टेट १३ वर्ष व प्रेरणा विविध कार्यकारी सेवा संस्था २२ वर्षा पासून सभासदांना नियमित लाभांशाचे वाटप करीत असल्याचा आम्हाला निश्चित अभिमान असल्याचे प्रेरणा अर्थ परिवाराचे संस्थापक सुरेश वाबळे यांनी लाभांश वाटप प्रसंगी सांगितले.

प्रेरणा अर्थ परीवार संस्थापक सुरेश वाबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रम प्रसंगी आज प्रेरणा परिवारातील प्रेरणा पतसंस्था, प्रेरणा मल्टीस्टेट व प्रेरणा विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चालू आर्थिक वर्षाच्या लाभांश वाटप प्रसंगी बोलत होते. यावेळी प्रेरणा मल्टिस्टेट चे चेअरमन सुजीत वाबळे, प्रेरणा पतसंस्थेचे व्हाइस चेअरमन मछिंद्र हुरूळे,प्रेरणा मल्टिस्टेट व्हा.चेअरमन प्रा.वेणुनाथ लांबे,प्रेरणा सोसायटी व्हा.चेअरमन अशोक उऱ्हे आदि उपस्थित होते.

 


  यावेळी बोलताना सुरेश वाबळे म्हणाले गेली ३२ वर्ष प्रेरणा पतसंस्थेने अतिशय काटकसरीचा, पारदर्शी व आर्थिक शिस्त पाळल्यामुळे आज संस्था तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात नावारूपाला आल्या त्या माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे बहुमोल मार्गदर्शनामुळे.

प्रेरणा पतसंस्था असो वा प्रेरणा सेवा संस्था जिरायत भागातील शेतकऱ्यांच्या पाठीशी त्यांच्या सुख दुःखात नेहमी उभे राहते शेतकऱ्यांना कधी दुष्काळाला, कधी वेळो अवेळी पडणाऱ्या पाऊसामुळे शेतकरी आर्थिक संकटास सामोरे जावे लागते त्यावेळी संस्था त्यांना आर्थिक अडचणीत उभी राहते.

प्रेरणा पतसंस्थेने गेल्या ३२ वर्षात १२५ कोटी रुपयाच्या ठेवी असून तालुक्यात या वर्षी तीन नवीन शाखा वांबोरी, ब्राम्हणी, व देवळाली प्रवरा येथे सुरु केल्या आहे. ३१ मार्च २०२६ अखेर संस्था निश्चितच १५० कोटींचा टप्पा पार करेल असा विश्वास सुरेश वाबळे यांनी व्यक्त केला. संस्थेने कर्ज वाटप करताना जे नियम घालून दिले त्या नियमानुसार व कोणतेही राजकीय हस्तक्षेप करता कर्ज वाटप केलेले असल्याने वसुली बाबत अडचण येत नसल्याचे सांगितले.

 यावेळी कार्यक्रमाला संचालक विष्णुपंत वर्पे अशोक आंबेकर भाऊसाहेब उर्हे भास्कर इरुळे मारूती लांबे जालिंद्रर वर्पे अशोक चंद्रे भाऊसाहेब चंद्रे मच्छिंद्र वरघुडे भागवत गागरे अक्षय ओहळ शरद वाबळे संकेत चंद्रे यांचे सह तिन्ही संस्थेचे सभासद, ग्रामस्थ अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार प्रा.विशाल वाबळे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments