Type Here to Get Search Results !

घोडेगावच्या डॉ. संजय सोनवणे पाटील यांचे पांढरे डाग , कोड ( vitiligo) यावरील संशोधनाला – आंतरराष्ट्रीय मान्यता

घोडेगावच्या डॉ. संजय सोनवणे पाटील यांचे पांढरे डाग , कोड ( vitiligo) यावरील  संशोधनाला  – आंतरराष्ट्रीय मान्यता



अहिल्यानगर   ( विशेष वृत्त )

आरोग्यसेवा ही केवळ व्यवसाय नाही, तर ती समाजसेवा आणि मानवतेचे कर्तव्य आहे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे घोडेगाव (ता. नेवासा, जि. अहील्यानगर) येथील आनंद हॉस्पिटल अॅिण्ड रिसर्च सेंटरचे संस्थापक व प्रमुख डॉ. संजय धोंडीराम सोनवणे पाटील



गेल्या २८ वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात अहोरात्र कार्यरत असलेल्या डॉ. सोनवणे यांनी होमिओपॅथी क्षेत्रात केलेल्या संशोधनाने हजारो रुग्णांचे जीवन बदलले आहे. त्यांच्या कार्यशैलीचा आधार नो इंजेक्शन, नो अॅाडमिशन या तत्त्वावर आहे. आता त्यांच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकात मान्यता मिळाली असून जागतिक पातळीवर त्याचे गौरव मानले जात आहे.

________________________________________

व्हिटिलिगो (पांढरे डाग/कोड) संशोधन – आंतरराष्ट्रीय मान्यता

घोडेगाव (ता. नेवासा, जि. अहील्यानगर) येथील आनंद हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरचे संस्थापक व प्रमुख डॉ. संजय धोंडीराम सोनवणे (B.H.M.S., C.C.M.P.) यांच्या नेतृत्वाखालील “Clinical Evaluation of Immunomodulatory Homoeopathic Therapy in the Management of Vitiligo – A Rural Maharashtra Experience” या संशोधन प्रबंधाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानांकन मिळाले आहे.



हा प्रबंध International Journal of Innovative Research in Technology (IJIRT), UGC-Compliant International Research Journal मध्ये ऑक्टोबर २०२५ (Volume 12, Issue 5) मध्ये प्रकाशित झाला आहे.

संशोधनात डॉ. सोनवणे यांनी २८ वर्षांच्या क्लिनिकल अनुभवावर आधारित हजारो रुग्णांवरील होमिओपॅथिक इम्युनोमोड्युलेटरी थेरपीचा प्रभाव दाखवला आहे. व्हिटिलिगो (पांढरे डाग/कोड) या दीर्घकालीन ऑटोइम्युन त्वचारोगावर नो इंजेक्शन, नो अॅडमिशन या तत्त्वावर पूर्णतः नैसर्गिक, सुरक्षित आणि प्रभावी उपचार पद्धतीचा उल्लेख केला आहे.

अभ्यासात ७,००० हून अधिक रुग्णांमध्ये स्टिरॉइड, यूव्ही थेरपी किंवा अन्य आक्रमक उपचार न वापरता त्वचेचा रंग पुन्हा प्राप्त झाल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत.

संशोधन सहलेखक म्हणून प्रा. मनीषा सोनवणे, प्रा. रुपाली माताडे, चैतन्य सोनवणे (B.H.M.S. विद्यार्थी) आणि सार्थक सोनवणे (M.B.B.S. विद्यार्थी) यांनी योगदान दिले आहे.

संशोधनाला ISSN 2349-6002 आणि Impact Factor 8.017 सह IJIRT ने मान्यता दिली असून प्रकाशित पेपरचा वेबलिंक: 🔗 https://ijirt.org/article?manuscript=185650

________________________________________

या पूर्वी  चिकुनगुनिया वरील संशोधन – मिनिटांत परिणाम, जागतिक मान्यता

मागील काही वर्षांत चिकुनगुनियाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशात थैमान घातले. आजार संपल्यानंतरही अनेक रुग्णांना वर्षानुवर्षे सांधेदुखी, कडकपणा, थकवा, सूज व अपंगत्व भोगावे लागत होते.

यावर उपाय म्हणून डॉ. सोनवणे यांनी “नो इंजेक्शन, नो अॅ डमिशन, नो सलाईन्स, नो अॅ क्युपंक्चर” या तत्त्वावर आधारित होमिओपॅथी संशोधन केले.

📌 रुग्ण जेव्हा नातेवाईकांच्या आधाराने रुग्णालयात येतो, तेव्हा उपचारानंतर तो स्वतःच्या पायावर चालत परत जातो — हा अनुभव हजारो रुग्णांनी दिला आहे.

📌 काही मिनिटांत वेदना कमी होणे, १–३ दिवसांत हालचालीत सुधारणा आणि १५ दिवसांत ते १ महिन्यात पूर्ण आरोग्यलाभ — अशा ठोस परिणामांची नोंद संशोधनात झाली आहे.

ही पद्धत चमत्कार नाही, तर दीर्घकालीन संशोधन आणि इम्युनोमॉड्युलेशन तत्त्वावर आधारित होमिओपॅथी उपचारपद्धतीचे फलित आहे.

International Medical Journal (Vol. 32, Issue 03, 2025) मध्ये प्रकाशित “Community-Level Homoeopathy Intervention for Post-Chikungunya Syndrome: A Rural Maharashtra Experience” या संशोधनात:

मिनिटांत आराम

१–३ दिवसांत कार्यक्षम हालचाल

३–६ महिन्यांच्या फॉलो-अपमध्ये संधिवाताचा धोका टाळला गेला

कोणतेही दुष्परिणाम न आढळणे

ग्रामीण भागातील रुग्णांचे प्रचंड समाधान

या सर्व निष्कर्षातून डॉ. सोनवणे यांच्या संशोधनाचा ग्रामीण आरोग्यसेवेत अद्वितीय परिणाम स्पष्ट होतो.

________________________________________

इतर आजारांवर संशोधन

डॉ. सोनवणे यांनी होमिओपॅथी क्षेत्रात केवळ चिकुनगुनियाच नव्हे, तर खालील आजारांवरही संशोधन केले आहे:

व्हिटिलिगो (पांढरे डाग/कोड)

दमा (Asthma)

संधिवात

मधुमेह

कोविड-१९

या सर्व आजारांवर शस्त्रक्रियेशिवाय, इंजेक्शनशिवाय व किफायतशीर पद्धतीने उपचार करून हजारो रुग्णांना बरे केले आहे.

________________________________________

पुरस्कार आणि जागतिक मान्यता

डॉ. सोनवणे यांच्या कार्याचा गौरव अनेक पुरस्कारांनी झाला आहे:

🏅 चिकित्सक रत्न पुरस्कार – २००४, नवी दिल्ली

🏅 राज्यस्तरीय आदर्श बहुजन मित्र पुरस्कार – २००५, अहमदनगर

🏅 राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार – २००६, आष्टी

🏅 समाज प्रबोधन पुरस्कार – २००८, नाशिक

🏅 कार्यगौरव पुरस्कार – मा. गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या हस्ते, शिर्डी

🏅 संत एकनाथ महाराज स्मृती गौरव पुरस्कार – पुणे

🏅 पद्मभूषण डॉ. रजनीकांत आरोळे स्मृती पुरस्कार – २०१२, जामखेड

🏅 सावित्रीबाई फुले समाजरत्न राज्यपुरस्कार – अकोला

याशिवाय त्यांचे नाव World Book of Records, London, Indian Book of Records, London Book of Records, American Merit Council Excellence Award अशा जागतिक मान्यतेत नोंदले गेले आहे.

________________________________________

सामाजिक बांधिलकी

मोठ्या शहरांत प्रॅक्टिस करण्याची संधी असूनही, डॉ. सोनवणे यांनी ग्रामीण जनतेच्या सेवेला प्राधान्य दिले.

ते रुग्णांच्या उपचाराबरोबरच जनजागृती, आरोग्य साक्षरता आणि सामाजिक upliftment यासाठीही कार्यरत आहेत.

________________________________________

निष्कर्ष

घोडेगावसारख्या छोट्या खेड्यातून सुरु झालेल्या डॉ. संजय सोनवणे यांच्या कार्याने आज जागतिक पातळीवर नाव कमावले आहे.

त्यांच्या संशोधनामुळे भारतीय होमिओपॅथी विज्ञानाला नवीन दिशा मिळाली असून, हे कार्य ग्रामीण भारताच्या सामर्थ्याचे आणि सेवा समर्पणाचे सर्वोत्तम उदाहरण ठरले आहे.

________________________________________

📌 संपर्क :

डॉ. संजय धोंडीराम सोनवणे पाटील

संस्थापक व प्रमुख – आनंद हॉस्पिटल अॅ ण्ड रिसर्च सेंटर, घोडेगाव, ता. नेवासा, जि. अहमदनगर, महाराष्ट्र – 414607

📞 02427-336312 | 📱 9822287376

________________________________________


**

Post a Comment

0 Comments