राहुरीचे आमदार कर्डिले यांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया - पोटतिडकीने काम करणारा नेता ; पक्षाला त्यांची सतत उणीव भासत राहील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सतर्क खबरबात जिल्ह्याची - विशेष वृत्त
राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संवेदना दिल्याअसून पोट तिडकेने काम करणारा नेता असे व्यक्तिमत्व कर्डिले यांचे होते , भाजपाला त्यांची सतत उणीव भासत राहील असे म्हटले आहे .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की , राहुरीचे आमचे आमदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे.
शेतकऱ्यांसाठी अतिशय पोटतिडकीने काम करणारा नेता पक्षाने गमावला आहे. जिल्हा बँक असो की दूध संघ शेतकऱ्यांसाठी त्यांनी प्रत्येक ठिकाणी काम केले. स्वच्छता आणि आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम सुद्धा उल्लेखनीय असे होते. मतदारसंघातील प्रश्न ते अतिशय पोटतिडकीने मांडत आणि त्यातून लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यात ते यशस्वी ठरले. तळागाळाशी जोडलेली नाळ आणि शेवटच्या घटकांसाठी काम हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांची उणीव पक्षाला सतत भासत राहील.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
ॐ शांति 🙏

Post a Comment
0 Comments