देवळालीत फटाके वाजवून शेतकरी कर्जमाफीचा जल्लोष
देवळाली प्रवरा ( प्रतिनिधी )
राज्यातील शेतकरी कर्जमाफीची घोषणा होताच देवळाली शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शेतकरी पुतळा येथे फटाके फोडून आणि जल्लोष करून शेतकरी बांधवांनी आपला आनंद व्यक्त केला.
या वेळी शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे, शेतकरी सेनेचे शहर प्रमुख जालिंदर मुसमाडे, तसेच शिवसेनेचे सुनील सिनारे, शिवाजी सांबारे, प्रगतशील शेतकरी विजय थोरात, किशोर राजोळे, अभिजीत कदम, श्री. शिंदे , गणेश भालेकर, सतीश पुंड, संभाजी कदम, शंकर कदम, संदीप पाटील, शरद होले, अशोकराव मुसमाडे, सलीमभाई शेख, श्री.संसारे, श्री देशमुख, यशवंतराव मोरे, अमोल तांबे, बाळासाहेब भांड, भाऊ माळी आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments