Type Here to Get Search Results !

भारत राष्ट्रभूषण पुरस्कार सिनेअभिनेता सुनील ईश्वर पाटील पुरस्काराने सन्मानित

भारत राष्ट्र भूषण पुरस्कार २०२५ सिने अभिनेता सुनील ईश्वर पाटील पुरस्काराने सन्मानित



 लोणी  ( प्रतिनिधी )

 बाभळेश्वर ते बॉलीवूड : सिनेअभिनेता सुनील ईश्वर पाटील यांचा यशस्वी प्रवास आता जागतिक गौरवाच्या शिखरावर नवी मुंबई सीआयडीसीओ ऑडिटोरियम, वाशी येथे आयोजित "भारत राष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा २०२५" मध्ये महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील बाभळेश्वर गावातून आलेल्या बहुपरिचित सिनेअभिनेता सुनील ईश्वर पाटील यांना त्यांच्या १३ वर्षांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासासाठी सन्मानित करण्यात आले.

 अल्बम गाणी, हिंदी व दक्षिण चित्रपटांमधून अभिनयाची सुरुवात करत त्यांनी बॉलीवूड ते हॉलिवूडपर्यंतचा प्रवास केला  हे यश ग्रामीण भारताच्या प्रतिभेचे जागतिक दर्शन आहे.


सुनील ईश्वर पाटील यांना अमेरिकेतील World University of New York (WUNY) यांच्या सहकार्याने "भारत राष्ट्र भूषण ऑफ एक्सलन्स" प्रदान करण्यात आले. त्यांच्या कार्याने नवोदित कलाकारांना स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची नवी दिशा दिली आहे.



 पुरस्कार प्रदान करणारे मान्यवर:  

- डॉ. अॅड. अशोक येंडे — महाराष्ट्राचे लोकपाल व वरिष्ठ वकील  

- डॉ. महेश कुमार — प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता  

- अॅड. रवी जाधव — बॉम्बे उच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष  

- डॉ. अॅड. राजसाहेब पाटील — सर्वोच्च न्यायालय, भारत


 समाजकार्याची प्रेरणा:  

सुनील ईश्वर पाटील यांनी पुरस्कार स्वीकारताना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियान उपक्रमास प्रेरित होऊन खान्देश परिसरात जनजागृतीसाठी डॉक्युमेंट्री फिल्म निर्मिती व महानगर पालिकेच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याचे सांगितले. त्यांनी समाजापर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहोचवण्याचा आणि भविष्यातही हा उपक्रम तळागाळात पोहोचवण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला.


सुनील पाटील यांचा प्रवास म्हणजे मेहनत, समर्पण आणि स्वप्नांची उंच भरारी!  

 "भारत राष्ट्र भूषण पुरस्कार" हे केवळ सन्मान नाही — ही आहे प्रतिभेची जागतिक मान्यता!  

 या सोहळ्याने भारतातील कलाकारांना जागतिक व्यासपीठावर नवी ओळख दिली आहे.

Post a Comment

0 Comments