Type Here to Get Search Results !

दिवाळीची स्थानिक बाजारपेठेतच खरेदी करा..या नेत्याने सपत्नीक आवाहन नव्हे तर कृतीतून दाखवले...

दिवाळीची स्थानिक बाजारपेठेतच खरेदी करा..  या नेत्यांनी सपत्नीक आवाहन नव्हे तर कृतीतून दाखवले...



राहुरी ( प्रतिनिधी )

राहुरीत तनपुरे कुटुंबियांची स्थानिक बाजारपेठेत खरेदी; नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य



ऑनलाइन खरेदी व बाहेरच्या शहरातील मॉल संस्कृती टाळून स्थानिक बाजारपेठ समृद्ध करण्याच्या उपक्रमाला राहुरीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी 


सोमवारी (दि. २० ऑक्टोबर २०२५) सायंकाळी सहकुटुंब राहुरी शहरातील स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करत समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले.



स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करताना तनपुरे यांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या भेटीदरम्यान व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण होते.



बोलताना तनपुरे म्हणाले,“दरवर्षी मी ऑनलाईन किंवा मोठ्या मॉलमध्ये खरेदी टाळून आपल्या राहुरी शहरातील बाजारपेठेतच खरेदी करतो. आपली स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत व्हावी, छोटे व्यापारी टिकून राहावेत यासाठी प्रत्येकाने आपल्या शहरातील बाजारपेठेला प्राधान्य द्यावे.



त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी व मुलगाही उपस्थित होते. स्थानिक दुकानदारांच्या दुकानात माजी मंत्री खरेदी करताना पाहून नागरिकांच्या चेहऱ्यावरआनंद झळकला .तर अनेक तरुणांनी तनपुरे यांच्या सोबत सेल्फी काढत फोटो काढले . तनपुरे यांचे पाय अजूनही जमिनीवर आहेत, तसेच त्यांच्यातील सामाजिक भावना आणि स्थानिकांप्रती जिव्हाळा स्पष्टपणे जाणवत होता.

Post a Comment

0 Comments