आमदार कर्डिले यांच्या निधनावर माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांची संवेदना ; राजकीय विरोधक असले तरी वैयक्तिक कटुता नव्हती
राहुरी ( विशेष वृत्त )
राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर माजीमंत्री प्राजक्त प्रसाद तनपुरे यांनी संवेदना व्यक्त करत ते राजकीय विरोधक असले तरी वैयक्तिक कटुता बाळगली नसल्याचे म्हणत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली .
राहुरीचे आमदार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले . निधनाची वार्ता समजताच राजकीय वर्तुळातही हळहळ व्यक्त होत आहे . कर्डिले यांचे विरोधक मानले जाणारे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे .
( माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांची प्रतिक्रिया )
( सौजन्य - सी 24 तास . राहुरी )
श्री तनपुरे यांनी म्हटले की , राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. माझे ते राजकीय विरोधक असले, तरी वैयक्तिक कटुता त्यांनी सहसा बाळगली नाही. सुमारे तीन दशकांचा त्यांचा राजकीय अनुभव होता.
इतक्या अनुभवी नेत्याच्या जाण्याने नगर जिल्ह्याचे देखील मोठे राजकीय नुकसान झाले आहे. या कठीण प्रसंगी तनपुरे कुटुंब कर्डिले कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. हे दुःख सहन करण्याचे बळ त्यांच्या परिवारास लाभो, हीच प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

Post a Comment
0 Comments