या राष्ट्रीय महामार्गाची पुरती गेलेली चव : या सेवानिवृत्त प्राध्यापकांनी व्हायरल केलेल्या कवितेची जोरदार चर्चा
राहुरी ( प्रतिनिधी )
नगर राहुरी कोपरगाव या राष्ट्रीय महामार्गाची पूरती चव गेलेली असताना त्यावर सोशल मीडियावर व प्रत्यक्षात वेगवेगळे मतप्रवाह दिसून येत असून राहुरीतील एका सेवानिवृत्त प्राध्यापक महोदयांनी यावर कविता सोशल मीडियावर दिली असून याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे .
नगर - कोपरगाव रस्त्याचे गेल्या काही काळापासून कोट्यावधी रुपयांची मंजुरी , लाखो रुपयांचे दुरुस्ती रस्त्याचे काम सुरू अशा राजकीय वल्गना वृत्त सोशल मीडियावर येत राहिले . मात्र जसजसे राजकीय चित्र पलटत राहिले तसतसे या रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये देखील खड्डे सर्वसामान्यांसह बाहेरील राज्यातील भाविक पर्यटक , राज्य , केंद्र सरकारमधील मंत्री , अधिकारी , एवढेच नव्हे तर अनेक ठिकाणच्या न्यायालयीन पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्षात अनुभवास आले . मात्र या रस्त्याची चव पूर्ती गेलेली आहे हे नक्कीच .
राहुरीतील सेवानिवृत्त प्राध्यापक गंगाधर रोहकले यांनी या विषयावर व्यतीत होत एक कविता सोशल मीडियावर दिली आहे . या कवितेची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे .
सतर्क खबरबात जिल्ह्याची ही कविता या ठिकाणी जशीच्या तशी देत आहे
“नगर–मनमाडचा रस्ता बोलतोय...”
खड्ड्यांनी सजलेला माझा साज बघा,
धूळ, चिखल, रक्ताचे डाग बघा.
प्रवाशांचा श्वासही अडकतो इथे,
राजकारण्यांचा मात्र कान बंद राहतो तिथे.
पावसात मी नदी बनतो, उन्हात मी वाळतो,
प्रत्येक गाडीखाली माझं हृदय थरथरतो.
वादे केली किती, पण कृती झाली नाही,
“विकास” म्हणे, पण इथे ओळखही नाही.
निवडणुकीत फोटो, घोषणांचा गजर,
पण नंतर पुन्हा मी — विस्मृतीतला सफर.
माझ्यावरून चालतात जनता नि स्वप्नं,
पण माझ्या जखमा कोण भरेल शेवटचं?


Post a Comment
0 Comments