Type Here to Get Search Results !

खड्ड्यांमध्ये पडले खड्डे : रस्त्याचे काम , सणाची गर्दी, मजुरांची जुगाडे , चाकरमानी वाहने - नगर मनमाड रस्ता जाम

 खड्ड्यांमध्ये पडले खड्डे : रस्त्याचे काम , सणाची गर्दी, मजुरांची जुगाडे , चाकरमानी वाहने - नगर मनमाड रस्ता जाम



राहुरी ( विशेष वृत्त )

नगर मनमाड रखडलेल्या रस्त्याचे काम ठिकठिकाणी सिंगल रोड वाहतूक साखर कारखाना मजुरांची वाहतूक आणि पावसामुळे नगर मनमाड रस्त्यावरील राहुरी ते कोल्हार वाहतूक सायंकाळी पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे वृत्त आहे .

नगर मनमाड हायवेचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहेत तर बऱ्याच ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे .

त्यातच गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने पावसामुळे या हायवेवर खड्ड्यांमध्ये खड्डे तयार झाले असून साचलेल्या पाण्यामुळे अपघात वाढले आहेत .

दिवाळी सणामुळे रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे . त्यातच आज रविवार असल्याने शिर्डी शनिशिंगणापूर साखर कारखाना मजूर वाहतूक या कारणांमुळे आज दुपारनंतर वाहतूक अनेक ठिकाणी विस्कळीत झाली असून वृत्त हाती येईपर्यंत ही वाहतूक अनेक ठिकाणी विस्कळीत झाली होती .

अतिरिक्त पोलीस बंदोबस्त करून वाहतूक सुरळीत करण्याची विनंती मागणी प्रवासी व नागरिकांनी केली आहे .

Post a Comment

0 Comments