Type Here to Get Search Results !

नगर जिल्ह्यातील या साखर कारखान्याने केला ऊस दर जाहीर

नगर जिल्ह्यातील या साखर कारखान्याने केला ऊस दर जाहीर



 राहुरी  ( प्रतिनिधी )  

          नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील मुळा सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम हंगामास आज उत्साहात प्रारंभ झाला .


 

        यावेळी ऊस उत्पादकांसाठी 3000 रुपये प्रति मॅट्रिक टन उसाचा दर जाहीर करण्यात आला आहे .


            याबाबत युवा नेते उदयन गडाख पाटील यांनी स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे .आज मुळा सहकारी साखर कारखाना लि., सोनई ता.नेवासा येथे सन २०२५-२६ चा ४८ वा ऊस गळीत हंगामास



प्रारंभ ज्येष्ठ साहित्यिक मा.खा.यशवंतरावजी गडाख साहेब, (संस्थापक मुळा उद्योग समूह) यांच्या अध्यक्षतेखाली व मा.आ.शंकररावजी गडाख साहेब यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात व आनंदमयी वातावरणात झाला.

या प्रसंगी कारखान्याने शेतकरी बांधवांसाठी ऊस दर रु. ३००० प्रति टन जाहीर केला आहे. 

तसेच शेतकरी हिताचे निर्णय घेत अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांसाठी ऊस बियाणे व खते उधारीवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय कारखान्याने घेतला आहे .

यावेळी कारखान्याचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ, सभासद व परिसरातील असंख्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमाची शोभा वाढवली.

मुळा परिवाराकडून सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा..!

Post a Comment

0 Comments