Type Here to Get Search Results !

कळसूबाई व हरिश्चंद्रगड रोपवे प्रकल्पाचे स्वप्न अंतिम टप्प्यात ; आराखडा व काम करण्यासाठी एजन्सीची निवड

कळसूबाई व हरिश्चंद्रगड रोपवे प्रकल्पाचे स्वप्न अंतिम टप्प्यात ; आराखडा व काम करण्यासाठी एजन्सीची निवड 



अहिल्या नगर ( विशेष वृत्त )

महाराष्ट्रासह अखंड हिंदुस्तान मध्ये प्रसिद्ध असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील दुर्गम अशा अकोले तालुक्यातील




हरिश्चंद्रगड आणि कळसुबाई शिखर हे अवघ्या पर्यटकांसाठी मोठी सुवर्णसंधी असते .

आता या ठिकाणी भव्य असा रोपवेचा प्रकल्प साकारण्यात येणार आहे . 

राष्ट्रवादी अजित दादा पवार पक्षाचे अकोले येथील आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या प्रयत्नातून या प्रकल्पाच्या आराखडा व काम करण्यासाठीच्या एजन्सीची निवड करण्यात आल्याची माहिती स्वतः आमदार डॉक्टर लहामटे यांनी सोशल मीडियावर दिली आहे . त्यात त्यांनी म्हटले आहे की

एक वर्षापासून सुरु असलेल्या प्रयत्नांना यश 

रस्ते व परिवहन मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या कडे केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून 

कळसूबाई व हरिश्चंद्रगड रोपवे अंतिम टप्प्यात आहे. हे 

काम करण्यासाठी Leading Edge counseltancy ची निवड.... या प्रकल्पाचे लवकरच स्वप्न साकार होऊ अशी अपेक्षा तमाम पर्यटन व जलदुर्ग गड दुर्गप्रेमींनी केली आहे. नगर जिल्ह्यातही याची स्वागत केले जात आहे .

Post a Comment

0 Comments