Type Here to Get Search Results !

प्रचाराची मुदत एक डिसेंबर रात्री 10 पर्यंत ; होऊ द्या जबरदस्त प्रचार

प्रचाराची मुदत एक डिसेंबर रात्री 10 पर्यंत ; होऊ द्या जबरदस्त प्रचार 



विशेष वृत्त - सतर्क खबरबात जिल्ह्याची

 नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होत असून, त्यासाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत ‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५’ मधील तरतुदीनुसार १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० पर्यंत असेल.




राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांस संबंधित कायद्यांमधील तरतुदींनुसार घेतल्या जातात. 



 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसंदर्भातील कायद्यात जाहीर प्रचाराचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. 




त्यानुसार मतदान सुरू होण्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजल्यापासून प्रचार पूर्णपणे बंद होईल.


 


त्यानंतर प्रचारसभा, मोर्चे आणि ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. त्याचबरोबर निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरातींची प्रसिद्धी किंवा प्रसारण करता येणार नाही. असे कळवले आहे .

Post a Comment

0 Comments