Type Here to Get Search Results !

दुर्गा बावके ‘महाराष्ट्र गौरव रत्न २०२५’ पुरस्काराने सन्मानित ; मराठी कला-सृष्टीचा अभिमान !

 दुर्गा बावके ‘महाराष्ट्र गौरव रत्न २०२५’ पुरस्काराने सन्मानित



मराठी कला-सृष्टीचा अभिमान !

लोणी ( प्रतिनिधी – ज्ञानेश्वर साबळे )

मराठी मनोरंजन क्षेत्रात उत्कृष्ट अभिनय,



सांस्कृतिक योगदान आणि सामाजिक कामात विशेष रस यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री दुर्गा बावके यांना यंदाचा ‘महाराष्ट्र गौरव रत्न – २०२५ हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. श्रीरामपूर शहरात सात डिसेंबर रोजी प्रथमच होणाऱ्या भव्य सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाणार आहे.

दुर्गा बावके यांनी मराठी अल्बम सॉंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून, दर्जेदार मराठी चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. मराठीसोबत त्यांनी साऊथ आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही दमदार भूमिका साकारत आपली स्वतंत्र छाप पाडली आहे.

अभिनयासोबतच त्या सामाजिक क्षेत्रातील उन्नतीसाठी कार्यरत असून, जनजागृती आणि समाजहिताच्या उपक्रमांत सक्रिय सहभाग देतात. त्यांच्या या सर्व कार्याचा योग्य सन्मान म्हणून यापूर्वीही अनेक प्रतिष्ठीत पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. या गौरवशाली परंपरेत ‘महाराष्ट्र गौरव रत्न – २०२५ हा मानाचा सन्मान त्यांना प्राप्त झाला आहे.

या पुरस्कारामुळे त्यांच्या चाहत्या प्रेक्षकवर्गात, मित्रपरिवारात आणि सहकलावंतांमध्ये आनंदाची लाट पसरली असून, शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments