राहुरी पालिकेत आज नगराध्यक्षपदासाठी तीन तर सदस्यपदासाठी 18 अर्ज दाखल ; सोमवारी दूध का दूध अन् पाणी का पाणी
Satark Khabarbat JilhyachiNovember 16, 20250
राहुरी पालिकेत आज नगराध्यक्षपदासाठी तीन तर सदस्यपदासाठी 18 अर्ज दाखल ; सोमवारी दूध का दूध अन् पाणी का पाणी
( नगर जिल्ह्यातील आजचे अपडेट )
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी नगरपालिका निवडणुकीसाठी आज रविवारी नगराध्यक्ष पदासाठी दोन जणांचे तीन अर्ज तर सदस्य पदाकरिता सतरा जणांचे 18 अर्ज दाखल झाले आहेत.
सोमवारी राहुरी नगरपालिकेत अर्ज भरण्यासाठी महा गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता मोठा पोलीस बंदोबस्त असण्याची शक्यता आहे .
रविवार अखेर राहुरी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी तीन जणांचे तीन अर्ज तर 25 जणांचे 26 अर्ज दाखल झालेले आहेत . दरम्यान शनिवार , रविवार सुट्टी असल्याने व शासनाच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या घोळामुळे अनेकांना माहिती समजू शकली नसल्याने आज गर्दी कमी होती . मात्र सोमवारी मोठ्या प्रमाणात गर्दीची शक्यता आहे .
उमेदवारांना सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी तीन वाजे नंतर आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत , अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनुप सिंह यादव व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत हराळे यांनी दिलीआहे
++++++++++++++++++++
मागील वृत्त पहा
दि.१५/११/२०२५ रोजी आलेले अर्जः
नगराध्यक्ष पद - बर्डे सखाहरी शांताराम
राहुरी नगरपरिषद सदस्य पदाकरिता काल आलेले अर्ज-दि. १४/११/२०२५-
Post a Comment
0 Comments