Type Here to Get Search Results !

हनुमंतगाव मध्ये भिल्ल समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न

 हनुमंतगाव मध्ये भिल्ल समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न


-- सतर्क खबरबात जिल्ह्याची मराठी न्यूज --

 लोणी ( प्रतिनिधी ) ज्ञानेश्वर साबळे

राहता तालुक्यातील हनुमंतगाव‌ येथे भिल्ल समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न झाली असून बैठकीत आदिवासी बचाव समिती स्थापन करणार असल्याचा



एकमुखी निर्णय सर्व आदिवासी नेत्यांनी घेतला आहे अशी माहिती आदिवासी नेते ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिली.

श्री. अहिरे म्हणाले की येत्या १६ नोव्हेंबर रोजी आदिवासी बचाव समिती स्थापन झाल्याची अधिकृत घोषणा लोणी येथील बैठकीत केली जाणार आहे. डॉ. मच्छिंद्र निकम यांच्या दशक्रिया विधी निमित्त जिल्ह्यातील प्रमुख भिल्ल समाजाचे नेते मोठ्या संख्येने हनुमंतगाव येथे उपस्थित होते. डॉक्टर निकम यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्या ठिकाणी बैठक घेण्यात आली त्यावेळी आदिवासींमध्ये होणारी घुसखोरी तसेच आदिवासींचे इतर प्रश्न या विषयावर प्राथमिक चर्चा झाली. व जिल्ह्यातील सर्व आदिवासी नेत्यांनी एकत्रित लढा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला त्यामुळे आदिवासी मधील होणाऱ्या घुसखोरी विरोधात जोरदार आवाज उठवला जाणार आहे त्याची पहिली ठिणगी हनुमंतगाव येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत पडली आहे. यावेळी आदिवासी भिल्ल समाजाच्या प्रमुख नेत्यांनी आपआपली मते मांडली. सर्वांचा सूर एकच होता त्यामुळे जिल्ह्यातील सर्व आदिवासी नेत्यांनी एकत्र येऊन लढा देण्याचा निर्णय प्राथमिक चर्चेत घेण्यात आला या नंतर लोणी येथे होणाऱ्या बैठकीत अधिकृत घोषणा केली जाणार आहे. या बैठकीला ज्ञानेश्वर अहिरे, शिवाजीराव गांगुर्डे, कैलास दादा माळी, दिलीपराव बर्डे, सुभाषराव पवार, रंगनाथ आहेर,मच्छिंद्र निकम, रावसाहेब बर्डे ,बाळासाहेब गांगुर्डे ,अनिल रोकडे, राधाकृष्ण बर्डे ,मारुती बर्डे,सोमनाथ माळी ,संतोष मोरे ,भारत बर्डे, सोमनाथ बर्डे, मारुती बर्डे, संपतराव मोरे ,सुदामराव मोरे, राजेंद्र पिंपळे ,गोरख पवार, चंद्रकांत रोकडे ,प्रल्हाद माळी ,चंद्रशेखर रोकडे ,बाळासाहेब पथवे ,जालिंदर निकम ,परसराम माळी, चंद्रकांत धीरोडे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments