अनेक कामे मंजूर मात्र प्रशासक राज मुळे झाली नाहीत ; आता विकास आघाडीची सत्ता येताच रस्त्यांच्या कामाला प्राधान्य - डॉ. उषाताई तनपुरे
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी नगरपालिकेच्या जनसेवा मंडळाच्या कार्यकाळात अनेक विकास कामे झाली .
मध्यंतरी प्रसासक राज मध्ये कामे मंजूर होऊन ती झाली नाहीत आता पालिकेवर विकास आघाडी च्या सर्व उमेदवारांना विजयी करून सत्ता द्यावी .
राहुरी शहर व परिसराचा सत्तेच्या माध्यमातून विकास केला जाईल अशी ग्वाही जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्य माजी नगराध्यक्ष डॉ.सौ उषाताई तनपुरे यांनी दिली.
राहुरी नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक सहा मधील विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाऊसाहेब मोरे व प्रभाग क्रमांक सहा मधील उमेदवार
संजीव सुधाकर उदावंत आणि माधुरी अनिल माळी यांच्या प्रचाराचा नारळ डॉ. सौ तनपुरे यांच्या हस्ते फोडण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
कासार गल्लीतील श्री गणेश मंदिरात उमेदवार नागरिक महिला यांच्या उपस्थितीत उत्साहात नारळ फोडण्यात आला. यावेळी डॉ. तनपुरे म्हणाल्या की मागील नगरपालिकेवरील सत्तेच्या काळात शहरात जॉगिंग ट्रॅकसह सर्व चौकांमध्ये सुशोभीकरण सेल्फी पॉईंट आदी शहराच्या वैभवात भर घालणारी कामे केली . शहरात शहराच्या ३ स्वागत प्रवेशद्वार बांधले असून या प्रवेशद्वारांवर श्री तुळजाभवानी माता, शहराची ग्रामदेवत हनुमान, तसेच राहू केतू यांची नावे असलेल्या प्रवेशद्वार करण्यात आल्या. रस्त्याचे प्रश्न पाण्याचे प्रश्न व अन्य विकास कामे केली मात्र प्रशासकीय राजवटीत प्रशासकाच्या कार्यकाळामध्ये अनेक मंजूर झालेली कामे करता आली नाही. शहरातील भूमिगत गटारीच्या कामामुळे सर्वत्र खड्डे पडले आणि नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले . मात्र त्या कामांचाही पाठपुरावा करण्यात आला. नगरपालिकेवर विकास आघाडीची सत्ता येताच राहुरी शहर व परिसरातील सर्व रस्त्यांची कामे कामांना अग्रक्रम दिला जाईल अशी ग्वाही यावेळी डॉ. सौ तनपुरे यांनी दिली.
डॉ. जयंत कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त करताना उदावंत व माळी हे उमेदवार प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य, कार्यक्षम व सर्वसमावेशक असल्याचे सांगितले. तसेच, त्यांची निवड माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे आणि विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब ‘चाचा’ तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून सर्वांनी त्यांना सहकार्य करून विजयी करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्षा सौ. सोनाली उदावंत, तसेच डॉ. जयंत कुलकर्णी, राजेंद्र उदावंत, योगेश चुत्तर, प्रशांत कोळपकर, वैभव सुराणा, सचिन बोरुडे, विलास उदावंत, सुरज बिहानी, डॉ. संतोष उदावंत, विजयी धिमटे, संतोष मैड, सुनील रासने, अनिल भट्टड, योगेश मालपाणी, नितीन शहाणे, रवींद्र उदावंत, दादासाहेब भडकवाड, अक्षय कोळपकर, अमर कुंभकर्ण, पियुष कोळपकर, महावीर आवटी, विश्वास बुर्हाडे, मनोज रासने, पत्रकार वसंत झावरे, प्रसाद मैड, श्रेयस लोळगे , दीपक नागरे,रत्नाकर जोशी, श्रीनिवास सहदेव, महेश उदावंत, अरुण दळवी, तुषार दळवी, अमोल गायकवाड, सिताराम माळी, जावेद शेख, सलीम बागवान यांसह परदेशी परिवार, नहार परिवार, सुराणा परिवार व प्रभाग ६ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments