पहा... राहुरी शहरात आपापल्या प्रभागात किती आहेत मतदार
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी शहरात नगरपालिका हद्दीत एकूण 33 हजार 270 मतदार असून 16589 पुरुष तर 16681 श्री मतदार आहेत . मतदार प्रभाग क्रमांक 12 मध्ये तर सर्वात कमी प्रभाग क्रमांक आठ मध्ये मतदार आहेत .
दोन डिसेंबरला राहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी एक तर बारा प्रभागातून 24 नगरसेवकांसाठीची निवडणुकीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार आहे .
नगरपालिका 92 श्री मतदार अधिकारी नगरपालिकेत निवडणूक कक्ष सज्ज झाला असून निवडणूक निर्णय अधिकारी , सहाय्यक अधिकारी यांचे वेगवेगळे कक्ष निर्माण करण्यात आले आहेत . पालिका निवडणुकीसाठीची यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे .
दरम्यान , प्रभाग क्रमांक एक मध्ये 1535 पुरुष 1454 महिला मतदार असून प्रभाग क्रमांक दोन मध्ये 1268 पुरुष तर १२३४ महिला मतदार आहेत . प्रभाग तीन मध्ये 1267 पुरुष 1242 महिला मतदार असून प्रभाग चार मधे 1382 पुरुष तर 1475 महिला मतदार आहेत . प्रभाग क्रमांक पाच मध्ये 1469 पुरुष तर 1517 महिला मतदारासून प्रभाग सहा मध्ये १३१३ पुरुष तर १३८७ महिला मतदार आहेत . प्रभाग सात मध्ये 1332 पुरुष तर 1456 महिला मतदार असून प्रभाग आठ मध्ये 780 पुरुष तर 859 महिला मतदार आहेत .
प्रभाग नऊ मध्ये 1489 पुरुष तर 1421 महिला मतदार असून प्रभाग 10 मध्ये 1244 पुरुष तर 1137 महिला मतदार आहेत तर प्रभाग 11 मध्ये 1612 पुरुष तर 1500 महिला मतदारासून प्रभाग 12 मध्ये 1898 पुरुष तर १९१३ महिला मतदार आहेत .
राहुरी शहरात साधारणतः 35 मतदान केंद्रांची रचना असली तरी मतदारांच्या संख्येनुसार मतदान केंद्रांची रचना करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे .


Post a Comment
0 Comments