Type Here to Get Search Results !

राहुरी पालिका निवडणुकीसाठी या नऊ जणांनी भरले आज अर्ज

राहुरी पालिका निवडणुकीसाठी या नऊ जणांनी भरले आज अर्ज


राहुरी ( प्रतिनिधी ) दि १५

राहुरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ करिता आज दि.१५/११/२०२५ नगराध्यक्ष पदासाठी ०१ (एक) व सदस्यसाठी ०९ (नऊ) अर्ज दाखल निवडणूक निर्णय अधिकारी- श्री. अनुपसिंह यादव यांनी दिली.



राहुरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ करिता आज दि.१५/११/२०२५ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी राहुरी नगरपरिषद अध्यक्षपदासाठी ०१ (एक) राहुरी नगरपरिषद सदस्य पदाकरिता ०९ (नऊ) अर्ज दाखल झालेला आहे. आजतागायत एकूण ११ अर्ज आले आहे.

  आज दि.१५/११/२०२५ रोजी आलेले अर्जः

नगराध्यक्ष पद - बर्डे सखाहरी शांताराम

राहुरी नगरपरिषद सदस्य पदाकरिता काल आलेले अर्ज-दि. १४/११/२०२५-

प्रभाग क्र. ३ (ब) -तनपुरे प्रियंका सोमेश्वर.

आज दि.१५/११/२०२५ -

प्रभाग क्र. २ (ब) गुंजाळ प्रताप भाऊसाहेब

प्रभाग क्र.३  (अ) गणेश शिवाजी धाडगे

प्रभाग क्र.४  (ब) शितल संदीप राउत

प्रभाग क्र.५  (ब) सातभाई गजानन भागवत

प्रभाग क्र.५  (ब) खैरे प्रसाद राजेंद्र

प्रभाग क्र.६  (ब) प्रकाश बन्सीलाल पारख

प्रभाग क्र.७  (अ) ज्ञानेश्वर भिमराज जगधने

प्रभाग क्र.९  (ब) शकुंतला बाळासाहेब इरुळे

प्रभाग क्र.१२ (अ) निलेश दिनकर शिरसाठ

  उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने दि.१५/११/२०२५ पासून ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास निर्देशित केलेले आहे. उमेदवारांना ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. नमुना अर्जाची सुविधा राहुरी नगरपरिषद कार्यालय येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांची अडचण होऊ नये म्हणुन रविवारी देखील अर्ज स्वीकारण्यात येतील. रविवार दि. १६/०१/२०२५ रोजी स.११.०० ते दु.३. ०० वाजेपर्यंत तसेच सोमवार दि.१७/११/२०२५ रोजी उमेदवारांना स.११.०० ते दु.३. ००ह्या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. त्यामुळे नगरपरिषदेच्या निवडणुकीकरिता इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरण्याकरिता होणारी धावपळ टाळण्यासाठी आपले अर्ज लवकरात लवकर भरावेत, तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या संदर्भातील, माहिती हवी असल्यास निवडणूक निर्णय अधिकारी कक्ष यांच्याशी संपर्क साधावा,

तसेच उमेदवारांना दि.१७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० नंतर आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव, व सहा. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित हराळे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments