अखेर राहुरीतील कोर्ट रोड ते मल्हारवाडी रस्त्याच्या कामाला मुहूर्त लाभला - माजी मंत्री प्राजक्त तनपुरे
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी नगरपालिकेच्या विकास कामासाठी जिल्हा नियोजन समिती व अन्य निधीच्या माध्यमातून या रस्त्यासाठी प्रयत्न केले होते .
67 लाख रुपयांच्या या कोर्ट रोड ( पाण्याची टाकी ) ते संत महिपती महाराज चौक ( मल्हारवाडी रोड ) या रस्त्याच्या डांबरीकरणाचे कामाची सुरुवात होत आहे .
दरम्यान , आज या कार्यक्रमात माजीमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले की , मी आमदार असताना या रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष दिले होते . जिल्हा नियोजन समितीत हा विषय झाला होता, मात्र नंतर काही अदृश्य शक्तींमुळे प्रशासकाच्या राजवटीमध्ये हा रस्ता होण्याचे स्वप्न तसेच राहिले .
आता राहुरी नगरपालिकेवर नूतन नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे येताच स्टॅंडिंग कमिटीची मीटिंग होत मंजुरी होऊन टेंडर प्रक्रिया व अन्य बाबी पूर्ण करत वर्क ऑर्डर मिळाली . यात आमच्या मार्गदर्शिका , जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्या सौ उषाताई तनपुरे , राहुरी नगरपालिकेचे गटनेता हर्ष तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मिताताई भारत भुजाडी , अविनाश मस्के , प्रदीप भूजाडी , व अन्य नगरसेवकांच्या माध्यमातून या कामात लक्ष दिल्याने या रस्त्याच्या डांबरीकरणाचा मार्ग मोकळा होतो आहे .
राहुरी शहरातील पाण्याच्या टाकी ते मल्हारवाडी रोडवरील या रस्त्याचा अनेक वर्षांपासून प्रश्न गंभीर होता . न्यायालयीन कामकाज , ग्रामीण भागातील जनता व शहरातील उपनगरीय नागरिक या मार्गाचा वापर करत असल्याने हा प्रश्न गंभीर बनला होता . हा रस्ता लवकरच होत असल्याने शहरवासीय व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे .


Post a Comment
0 Comments