सूरत - चैन्नई एक्सप्रेस हायवे बाबत आली मोठी अपडेट.... पहा काय ते
सतर्क खबरबात जिल्ह्याची - ( विशेष वृत्त )
नाशिक - चेन्नई एक्सप्रेस हायवेच्या दोन टप्प्यांच्या नुकत्याच निविदा मागवण्यात आले असून एप्रिल महिन्यात निविदा मंजूर होत भूसंपादनाचा मार्ग मोकळा होणार आहे .
राहुरी तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून मोबदल्याच्या प्रश्नामुळे विरोध कायम असल्याचे चित्र दिसत आहे .
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ( एन एच ए आय ) ने सुरत - चेन्नई या ग्रीनफिल्ड एक्सप्रेस ची सूचना 2013 मध्ये जारी केली होती . त्यानंतर मोठा कालखंड होत विषय रखडला . या महामार्गावरील जमिनीवर एन एच ए आय चा बोजा पडल्याने शेतकरी हैराण झालेले असताना मोबदला जाहीर न झाल्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे .
असे असताना मागील महिन्यात केंद्र सरकारने या एक्सप्रेस हायवे ला 19000 कोटी रुपयांची मंजुरी दिली . त्यानंतर हालचाली वेगाने वाढत नुकत्याच नाशिक - चेन्नई एक्सप्रेस हायवे मधील नाशिक ते अक्कलकोट या टप्प्याचे निविदा मागवण्यात आल्याचे सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहे .
हा ग्रीनफिल्ड एक्सप्रेस हायवे नाशिक ते अहिल्यानगर पहिला टप्पा आणि अहिल्यानगर ते अक्कलकोट अशा दोन टप्प्यात 374 किलोमीटर कामाच्या निविदा मागवण्यात आल्याचे प्रसिद्ध झाले आहे . दोन टप्प्यासाठी दोन स्वतंत्र निविदा या एप्रिलमध्ये मंजूर होण्याची शक्यता असून लगेचच भूसंपादनाचा मार्ग मोकळा होणार आहे .
मात्र राहुरीतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा व मोबदला जाहीर न झाल्याने विरोध कायम आहे . नाशिक - अक्कलकोट एक्सप्रेस हायवे झाल्यानंतर दहा तासांचा प्रवास अवघ्या चार तासांवर येणार आहे . सध्या नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतुकीचा ताण पडत असून २०२७ च्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी केंद्र सरकारकडून महामार्ग व रेल्वे मार्ग यांच्या विकास कामांचा धडाका सुरू आहे .


Post a Comment
0 Comments