Type Here to Get Search Results !

चला..... करूया या अनोख्या गावाची व्हिडिओ सफर !!

 चला..... करूया या अनोख्या गावाची व्हिडिओ सफर !!



सतर्क खबरबात टीम - ( विशेष व्हिडीओ वृत्त )




या गावकऱ्यांच्या कलेमुळे देशभर हेरिटेज व्हिलेज म्हणून कोरले नाव !!



हेरीटेज व्हिलेज - रघुराजपूर ( चंदनपूर ) 

जगन्नाथ पूरी ओडीशा :





आपल्या देशात ६४ कला अस्तित्वात आहेत आणि अनेक ठिकाण विविध कला गुणांनी प्रसिद्ध झाली आहेत .

अशाच एका गावाची आपण सफर केली आहे . अखं गावच एका विशिष्ट प्रकारच्या कलेचे धनी आहेत .

ओडिशातील प्रसिद्ध जगन्नाथ पुरी येथून 15 किलोमीटरवर असणाऱ्या रघुराजपूर या गावाची देशभर चर्चा असते . कारणही तसेच , या छोटासा रघुराजपूर गावात ग्रामस्थांनी पट्टचित्र पेंटिंग कला , तस्सर पेंटींग , शिल्पकला , असा वारसा जपत गावाचे नाव हेरीटेज व्हिलेज म्हणून प्रसिद्ध केले आहे .


या गावातील अनेकांना कलेमूळे पुरस्कार मिळालेले आहेत . गावात पावणे दोनशे घरात ही कला आपले मन जिंकून घेते .

पुण्यातील साईराज या नवख्या कलागुण जपणाऱ्या विद्यार्थ्याने ही या गावाची माहिती देताना म्हणले की , आपणही या हेरिटेज व्हिलेजला भेट द्यावी . पर्यटक सुरेश म्हसे यांनीही या गावाला भेट देऊन गावकऱ्यांच्या कलेचे कौतुक केले आहे . तर आपणही जगन्नाथ पूरी ला गेल्यावर साक्षी गोपाल, रघुराजपूर [ हेरीटेज व्हिलेज ] ला नक्की भेट द्या .

Post a Comment

0 Comments