Type Here to Get Search Results !

शाळेतील विद्यार्थ्यांना वाढदिवसाला चॉकलेट न देता पुस्तक भेट ; अनोख्या उपक्रमाचे होतय स्वागत

शाळेतील विद्यार्थ्यांना वाढदिवसाला चॉकलेट न देता पुस्तक भेट ; अनोख्या उपक्रमाचे होतय स्वागत


देवळाली प्रवरा ( प्रतिनिधी )

 देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यार्थी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेमध्ये चॉकलेट वाटून वाढदिवस साजरा करत होते . परंतु या शाळेच्या शालेय शिक्षण कमिटी च्या वतीने अध्यक्ष जालिंदर मुसमाडे , उपाध्यक्ष पुष्पा बोरकर सदस्य व मुख्याध्यापिका नंदा थोरात यांचे सह पालक यांच्यात सविस्तर चर्चा करत यापुढे विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त चॉकलेट वाटप न करता शालेय ग्रंथालयास कुठल्याही प्रकारचे सामाजिक भाविक राष्ट्रपुरुष कवियत्री महापुरुष अशांची फोटो अथवा पुस्तके देऊन वाढदिवस करण्याचे सर्वानुमते ठरले . 

असे ठरल्यानंतर आजच्या वाढदिवशी एडवोकेट विजय भीमराज शेटे यांची कन्या स्वरा विनोद शेटे इयत्ता चौथी मध्ये शिक्षण घेत आहे . तिच्या वाढदिवसानिमित्त तिने आज रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक शाळेला सप्रेम भेट देऊन एक अनोखा वाढदिवस साजरा केला . त्याबद्दल तिचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला . याप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष जालिंदर मुसमाडे उपाध्यक्ष पुष्पाताई बोरकर मुख्याध्यापिका नंदा थोरात मॅडम सदस्य बशीर सय्यद सतीश जाधव वैशाली काळे मस्कुले मॅडम तांबे सर उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments