राहूरीत मंगळवार दि. २४ मार्च रोजी विराट हिंदू संमेलनाचे आयोजन
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी शहरात हिंदू जागरणच्या वतीने मंगळवार, दिनांक २४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन सौ.भागिरथीबाई तनपुरे कन्या शाळेच्या प्रांगणात पार पडणार आहे.
या संमेलनात संत परंपरेतील मान्यवर व धार्मिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. संत तुकाराम महाराजांचे १०वे वंशज ह.भ.प. श्री तुकाराम महाराज मोरे, महामंडलेश्वर श्री सुधाकर चतुर्वेदी योगाचार्यजी महाराज, तसेच संत महिपती महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. बाळकृष्ण महाराज कांबळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यासोबतच हिंदू धर्म जागरण प्रांत मंडळाचे सदस्य सुनिल काळे हे देखील उपस्थित राहून हिंदू समाजातील विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
या विराट हिंदू संमेलनाच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश दिला जाणार असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


Post a Comment
0 Comments