Type Here to Get Search Results !

पत्रकार कुलकर्णी यांना मातृशोक ; राहुरीत ज्येष्ठ नागरिक प्रमिला कुलकर्णी यांचे निधन

 पत्रकार कुलकर्णी यांना मातृशोक ; राहुरीत ज्येष्ठ नागरिक प्रमिला कुलकर्णी यांचे निधन



राहुरी फॅक्टरी ( प्रतिनिधी )

गुरुकुल वसाहत, राहुरी फॅक्टरी येथील रहिवासी गं. भा. प्रमिला वासुदेव कुलकर्णी (वय 86) यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात कुटुंबीय असा मोठा परिवार असून त्या दैनिक ‘सकाळ’चे पत्रकार विलास कुलकर्णी, भागीरथीबाई तनपुरे कन्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक बाळकृष्ण कुलकर्णी तसेच अकोले येथील न्यायालयाचे अधीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मातोश्री होत.

त्यांचा अंत्यविधी आज, दिनांक 23 मार्च 2026 रोजी रात्री 10 वाजता राहुरी फॅक्टरी येथील अमरधाम येथे होणार आहे.

Post a Comment

0 Comments