कृषि विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. दत्तात्रय कदम यांची तर व्हाईस चेअरमनपदी सौ. भारती बरे यांची निवड
राहुरी विद्यापीठ - प्रतिनिधी
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील कृषि विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदांच्या निवडीसाठी जिल्हा उपनिबंधक श्री. मंगेश सुरवसे यांचे उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्वानुमते चेअरमनपदी श्री. दत्तात्रय कदम तर व्हाईस चेअरमनपदी सौ. भारती बरे यांची निवड करण्यात आली.
यावेळी संस्थेचे संचालक डॉ. विक्रम कड, डॉ. नारायण मुसमाडे, श्री.योगेश भिंगारदे, श्री.आप्पासाहेब चोपडे, संचालिका सौ.माधुरी औताडे तसेच पतसंस्थेचे कर्मचारी व सभासद उपस्थित होते. कृषि विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्था मर्या. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी ही जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात नावाजलेली पतसंस्था असून या पतसंस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या सभासदांची आर्थिक उन्नती साधण्यामध्ये मोठा वाटा आहे. या पतसंस्थेच्या वाटचालीमध्ये सर्व आजी व माजी संचालकांचा आणि सभासदांचा मोलाचा वाटा आहे. नुकतीच झालेली पतसंस्थेच्या चेअरमन आणि व्हॉइस चेअरमन पदाची निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. पदाधिकार्यांच्या या निवडीबद्दल महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे व संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांनी त्यांचे अभिनंदन केले.


Post a Comment
0 Comments