देशातील कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभियान - प्रांत धर्मजागरण संयोजक सुनीलराव काळे
राहुरीत हिंदू संमेलन समितीच्या वतीने आयोजित हिंदू संमेलन
राहुरी ( प्रतिनिधी )
भारतीय संस्कृती ही वसुधैव कुटूंबम आहे , भारतीय कुटूंब व्यवस्था मोडकळीस आणण्यासाठी काहींनी षडयंत्र तयार केले असुन ती संपविण्याचा घाट घातला आहे . कुटूंब व्यवस्था टिकविण्यासाठी १०० वर्षापुर्वी डॉ हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली , असे प्रतिपादन - हिंदू जागरण प्रांतमंडळ सदस्य सुनिलराव काळे यांनी केले .
राहुरी येथील सौ भागीरथीबाई तनपुरे विद्यालयाच्या प्रांगणात हिंदू संमेलन समितीच्या वतीने आयोजित भव्य विराट हिंदू संमेलन सभेत ते बोलत होते .
सुनिलराव काळे पुढे म्हणाले , हिंदुनी आत्मकेंद्रीत स्वभाव बदलून राष्ट्रप्रेमाने प्रेरित झाला पाहिजे . हिंदू समाजाकडे एक सशक्त शक्ती आहे . सज्जनाची व्याख्या बदलण्याची वेळ आली आहे . जो राष्ट्रासाठी , धर्मासाठी , जगतो लढतो तो खरा सज्जन होय .
आत्मकेंद्रीत स्वभावापासुन आपल्याला बाहेर पडावे लागले . एकतर्फी भाईचारा आपण थांबवला पाहिजे . परकीय आक्रमणाने हिंदुना शेळी बनवले आहे . आम्ही वाघाचे , महाराणा प्रताप , छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज , हिंदूचे वंशज आहोत , फक्त आमच्यातला वाघ जागा होण्याची गरज आहे .
तुकाराम महाराजांचे दहावे वंशज तुकाराम मोरे महाराज म्हणाले की , कुटूंब प्रबोधन काळाची गरज आहे , भारतीय कुटूंब व्यवस्था टिकविण्यासाठी घरातील सदस्यांमध्ये संवाद वाढण्याची गरज आहे . संताची शिकवण आचरणात आणून वृक्ष लागवड केली पाहिजे व वृक्ष जगले पाहिजे तरच आपले भविष्य उज्ज्वल आहे .
ह भ प महामंडलेश्वर श्री सुधाकर चतुर्वेदी योगाचार्य महाराज म्हणाले की, आम्ही गेली पन्नास वर्षे गो हत्याबंदी व लव्ह जिहाद वर काम करत आलो असून अद्याप पाहिजे तेवढे यश आले नाही . संविधानात आत्म संरक्षणासाठी केलेला हल्ला हा गुन्हा ठरत नाही . संविधान तुम्हाला पुर्ण आत्मसंरक्षणाचा अधिकार प्रदान करते . जो पर्यंत अधर्माचा नाश होणार नाही तो पर्यंत धर्माचा विकास होणार नाही . अध्यात्माने सामाजिक क्रांती होऊ शकेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जातीय व्यवस्था नाही, धर्माच्या रक्षणासाठीच मी संन्यास घेतला आहे .
यावेळी राहुरी तालुका संघचालक अनिलराव तांबे , प्रांत धर्माचार्य संपर्क मंडळाचे सदस्य आबा मुळे , राहुरीच्या माजी नगराध्यक्षा डॉ . सौ उषाताई तनपुरे, राजयोग भवनच्या ब्रह्मकुमारी नंदा दीदी , हिंदू संमेलन समितीचे अध्यक्ष तथा धर्माचार्य बाळकृष्ण महाराज कांबळे , उपाध्यक्ष डॉ . रामकिसन ढोकणे, उपस्थित होते . सूत्रसंचालन यांनी केले . प्रा रामकिसन ढोकणे यांनी आभार मानले . यावेळी राहुरी शहरासह पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने हिंदू बांधवांसह महिला भगिनी उपस्थित होत्या .
या संमेलनापूर्वी राहुरी शहरातील शनि चौक ते सौ भागीरथीबाई तनपुरे विद्यालयापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली . या शोभायात्रेत डोली बाजा , बाल टाळ मृदुंगासह विविध राष्ट्रपुरुष विरांगणाच्या पोशाखात लहान मुले सहभागी झाली . तसेच गोटुंबे आखाडा येथील धनगर समाजाच्या युवकांनी पारंपारिक वाद्याचे वादन करत संमेलनात सहभाग नोंदवाला .


Post a Comment
0 Comments