Type Here to Get Search Results !

राहुरीत सकाळी 11 पर्यंत केवळ अठरा टक्के झाले मतदान

 राहुरीत सकाळी 11 पर्यंत केवळ अठरा टक्के झाले मतदान



राहुरी  ( प्रतिनिधी )

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी 11 वाजेपर्यंत केवळ 18% मतदान झाले . कै . शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरीच्या विधानसभा पोटनिवडणूक होत आहे .



निवडणूक निर्णय अधिकारी अनुप सिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रशासनाकडून यंदा प्रथमच 374 मतदान केंद्रांवर आधीच साहित्य पोहोच करण्यात आले होते .


 


त्यामुळे ठीक ठिकाणी मतदान केंद्रांवर अधिकारी कर्मचारी आपल्या वाहनाने आले होते .



सकाळपासून मतदानासाठी उत्साह कमी दिसून आला . माजी खासदार प्रसाद तनपुरे , त्यांच्या पत्नी डॉ . सौ उषाताई तनपुरे यांनी राहुरी शहरात प्रगती विद्यालयात मतदान केले तर माजी मंत्री व या पोटनिवडणुकीतून माघार घेतलेले प्राजक्त तनपुरे यांनी सकाळी 11 वाजता प्रगती विद्यालयात मतदान केले . कै . शिवाजी कर्डिले यांचे सुपुत्र व भाजपा उमेदवार अक्षय कर्डिले यांनी नगर तालुक्यातील बु-हाननगर येथे मतदान केंद्रात मतदान केले . 

दरम्यान , राहुरीत प्राजक्त तनपुरे यांनी मतदान झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले की , मी अजूनही शरदचंद्र पवार राष्ट्रवादीतच असून भाजपात जाण्याचा प्रश्नच नाही . ही सार्वत्रिक नव्हे तर कै . शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे . त्यामुळे आपण माघार घेण्याचा निर्णय घेतला असून सध्या ईडीच्या प्रकरणात यापूर्वीच क्लोजर रिपोर्ट आल्याचे तनपुरेंनी स्पष्ट केले .

Post a Comment

0 Comments