राहुरी विधानसभा पोटनिवडणुक - 56 % झाले मतदान
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी विधानसभा पोट निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त मतदान झाले असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण टिंब टिंब इतके मतदान झाले . मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली .
मतदारसंघातील नेत्यांनी आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला .
निवडणूक निर्णय अधिकारी अनुप सिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रशासन व पोलीस विभाग यांनी महत्त्वाची भूमिका साकारली . सकाळी मतदानाचा वेग बऱ्यापैकी तर दुपारी कमी होता . दुपारनंतर मतदानाचा वेग काहीसा वाढला . सायंकाळी सहा वाजेपर्यंत समाधानकारक असे मतदान पार पडले .
उन्हाची तीव्रता जादा असल्याने मतदानावर त्याचा काहीसा परिणाम दिसून आला . राजकीय पक्ष व अपक्षांच्या नेते कार्यकर्ते मंडळींनी मतदान वाढीसाठी चांगले प्रयत्न केले . येत्या चार मे रोजी मतमोजणी होणार असल्याने कोण निवडून येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .



Post a Comment
0 Comments