अत्याधुनिक गॅस्ट्रोस्कॉपी सेंटरचा राहुरी येथे शुभारंभ
राहुरी ( प्रतिनिधी )
अक्षय तृतीया या शुभमुहूर्तावर लिव्हर आणि पोटाचे विकारांचे तज्ञ डॉ. इंद्रनील कुलकर्णी यांनी कुलकर्णी हॉस्पिटल, राहुरी येथे अत्याधुनिक गॅस्ट्रोस्कोपी सेंटरची सुरुवात केली.
गेस्ट्रोस्कोपी म्हणजे अन्नपचनसंस्थेच्या सुरुवातीच्या भागाची म्हणजे घसा, अन्ननलिका, जठर, लहान आतड्याचा पहिला भाग यांची दुर्बिणी द्वारे तपासणी करणे. ही अतिशय सोपी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत एक बारीक लवचिक ट्यूब कॅमेऱ्यासह तोंडाद्वारे प्रवेशित केली जाते. या प्रक्रियेत कोणत्याही वेदना होत नाहीत. अन्नपचन संस्थेच्या सुरुवातीच्या भागात असणारे विविध आजार उदाहरणार्थ सूज असणे, रक्तवाहिन्यांचे जाळे तयार होणे, गाठ असणे, जखमा असणे, आकुंचन असणे, हायाटस हर्निया असणे किंवा कॅन्सरची गाठ असणे यांची प्रत्यक्ष तपासणी केली जाते. तसेच त्यावरील उपचारही केले जातात. या मार्गात चुकून गेलेले पदार्थ उदाहरणार्थ नाणी, पीन. खिळा इत्यादी असल्यास या प्रक्रियेद्वारे तेही बाहेर काढता येतात. गॅस्ट्रोस्कोपी ही प्रक्रिया पाच ते दहा मिनिटात पूर्ण होते. दवाखान्यात ऍडमिट राहण्याची वेळ येत नाही.
डाॅ. इंद्रनील कुलकर्णी यांनी ऑलिम्पस या बहुराष्ट्रीय कंपनीची प्रणाली घेतली आहे.आज मितीस ही सर्वात प्रगत प्रणाली आहे. या सेंटरचे शुभारंभ प्रसंगी माननीय श्री अरुण साहेब तनपुरे, मा.श्री रावसाहेब चाचा तनपुरे, डॉ. शरद धावडे,मा.श्री भाऊसाहेब मोरे सर अध्यक्ष राहुरी नगरपरिषद, मा.श्री गजानन सातभाई उपाध्यक्ष राहुरी नगरपरिषद, श्री अरिफ शेख नगरसेवक, श्री सुनील भुजाडी, श्री सुरेश भुजाडी, डॉ. भरत पैठणे, डाॅ संजय म्हसे, डॉ.अभिजीत शिरसाठ, श्री. जी आर शिरसाट सर, श्री योगेश देशमुख, डॉ. श्रीकांत कुलकर्णी, डॉ. तनया कुलकर्णी, पांडूशेठ उदावंत, श्री विष्णू औटी, श्री शिरसाठ रावसाहेब श्री बाळासाहेब रासने, श्री संजय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments