राहुरीत ज्येष्ठ नागरिक सिताराम घाडगे यांचे निधन; परिसरात हळहळ
राहुरी फॅक्टरी - ( प्रतिनिधी )
राहुरी फॅक्टरी परिसरातील मुळा कॉलनी येथील रहिवासी तथा राहुरी कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी श्री. सिताराम रंगनाथ घाडगे (वय ८४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी कारखाना स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
स्वर्गीय घाडगे हे पत्रकार शिवाजी घाडगे तसेच व्यावसायिक रंगनाथन घाडगे यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे, एक मुलगी, दोन भाऊ व बहिणी असा मोठा परिवार आहे.
सिताराम घाडगे हे उच्च शिक्षित, शांत, संयमी व मनमिळाऊ स्वभावाचे होते. ‘अण्णा’ या नावाने ते परिसरात सर्वांना परिचित होते. त्यांच्या साध्या आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी अनेकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले होते.
त्यांच्या निधनाने राहुरी परिसरात शोककळा पसरली असून विविध स्तरांतून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

Post a Comment
0 Comments