Type Here to Get Search Results !

आंबी अंमळनेरच्या अंबिकेश्वराची रविवार दि १९ रोजी यात्रा

आंबी ( ता - राहुरी ) अंमळनेरच्या अंबिकेश्वराची रविवार दि १९ एप्रिल रोजी यात्रा 



आंबी ( पत्रकार जाधव यांजकडून )

 राहुरी तालुक्यातील धार्मिक गाव म्हणून लौकीक असलेल्या आंबी अंमळनेर या दोन्ही गावचे ग्राम दैवत असलेल्या श्री अंबिकेश्वराची यात्रा आज साडेतीन मुहर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयाच्या शुभदिनी भरणार असून यात्रोत्सव तिन दिवस चालणार आहे. 



प्रारंभी मंदिर परीसर सुशोभित करण्यात येऊन आज सकाळी ७ वा .कावडीने आणलेल्या गंगाजलाची गावातून मिरवणुक होऊन श्री महादेवाचा महारुद्राभिषक करण्यात येईल. सायंकाळी ७ ते १० फटाक्याच्या आतषबाजी करत व्रास ब्रान्ड च्या सवाद्यात छविना मिरवणुक गावात निघणार आहे. 

सोमवारी सायंकाळी ४ वा 'नामवंत मल्ल यांच्या प्रमुख उपस्थीत कुस्त्याचा जंगी हगामा व भरगच्च यात्रा भरणार आहे. मंगळवार दि२१ | ४ | २०२६ रोजी सायंकाळी ९ वा. स्वप्न सुंदरी ऑक्रेष्टा सिने अभिनेत्री सुवर्णा काळे यांचा लावण्याचा कार्यक्रम होणार आहे. 

यात्रा उत्सव शांततेत पार पडण्यासाठी आयोजक यात्रोत्सव कमेटीसहआंबी अंमळनेर रुमस्त ग्रामस्थ प्रयात्नशिल आहे. श्री अंबिकेश्वराच्या या पावन भूमित सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असून गावात सदैव सुकाळ नांदतो अशी भाविकाची दृढ श्रद्धा असल्याने श्री अंबिकेश्वराच्या चरणी अबालवृद्ध नतमस्तक होउन लिन होतात.

Post a Comment

0 Comments