दौऱ्याचा वाढला सस्पेन्स ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राहुरीच्या दौऱ्याची जोरदार चर्चा
सतर्क खबरबात जिल्ह्याची - प्रसाद मैड ( संपादक )
जसं जसे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचे मतदान जवळ आले असताना मोठा राजकीय द्विस्ट दिसत असून उद्या राहुरीत मुख्यमंत्री फडणवीस प्रचारसभेत काय बोलणार ? याची चर्चा सुरू आहे .
आज अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस , अक्षय तृतीयेला आंब्याचे महत्त्व असते . याच काळात राहुरीची विधानसभा पोटनिवडणूक सुरू असून आमदारकीचे प्रबळ दावेदार व भाजपा उमेदवार यांचे नाव अक्षय असून भाजपच्या वरिष्ठ नेते राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व विधान परिषदेचे उपसभापती प्रा . राम शिंदे यांनी राहुरीतील भाजप उमेदवाराच्या प्रचारादरम्यान स्थानिक कार्यकर्त्यांच्या घरी भोजन करत आमरसाचा ही आस्वाद घेतला होता .
या पार्श्वभूमीवर उद्या ( दि २० ) भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सायंकाळी शहरातील नवी पेठ येथे भव्य प्रचार सभा होत आहे . राहुरीत अनेक प्रचार सभा गाजल्या . मात्र या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांची राहुरीत एकमेव मोठी अशी प्रचार सभा शनिवार दिनांक 18 एप्रिल रोजी झाली . या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला . या पाठोपाठ मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रचार सभा होत आहे .
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे सध्या सर्वत्र चर्चेत असल्याने उद्या तनपुरे यांची पोटनिवडणुकीसाठी राजकीय भूमिका जाहीर होऊ शकते . या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस राहुरीत नेमके काय बोलणार ? निवडणुकीतून माघार घेतलेल्या श्री. प्राजक्त तनपुरे यांच्याबाबत काय सुतोवाच करणार व सायंकाळच्या प्रचार सभेदरम्यान काय हालचाली राहतील ? याकडे संपूर्ण राहुरी शहरासह राहुरी विधानसभा मतदारसंघातील राहुरी , पाथर्डी , नगर तालुक्यातील सर्वांचेच लक्ष लागले आहे .


Post a Comment
0 Comments