Type Here to Get Search Results !

या सामान्य कार्यकर्त्याला मिळाला मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्याचा मान

या सामान्य कार्यकर्त्याला मिळाला मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्याचा मान 



राहुरी (प्रतिनिधी )

         राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहुरी येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी शिर्डी विमानतळावर काल आगमन झाले . यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अन्य भाजप नेत्यांसमवेत राहुरी येथील भारतीय जनता पक्षाचे राहुरी मंडल अध्यक्ष विक्रम भुजाडी यांना फडणवीस यांचे स्वागत करण्याचा मान मिळाला .



           मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एक्स या सोशल मीडियावरील अधिकृत वॉलवर तसेच फेसबूक वर देखिल हा फोटो झळकल्यानंतर राहुरी शहरासह सर्वत्र या फोटोची चर्चा सुरू झाली .

            श्री . विक्रम भुजाडी हे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते असून सध्या त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या राहुरी मंडल अध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे .  श्री .भूजाडी सारख्या सामान्य कार्यकर्त्याला  मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्याचा मान मिळाल्याने याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे .

Post a Comment

0 Comments