Type Here to Get Search Results !

सौ. प्रभाताई सूर्यवंशी श्रमिक प्रतिष्ठानचा १२ वा आदर्श माता पुरस्कार सी.लुसी कुरियन यांना प्रदान

 सौ. प्रभाताई सूर्यवंशी श्रमिक प्रतिष्ठानचा १२ वा आदर्श माता पुरस्कार सी.लुसी कुरियन यांना प्रदान



सांगली (  विशेष प्रतिनिधी )

 सौ.प्रभाताई सूर्यवंशी यांच्या नावे दिला जात असलेला आदर्श माता पुरस्कार करुणा आणि धाडसाचे जीवन



जगणाऱ्या सी लुसी कुरियन यांना शनिवार दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉक्टर दीपांजली कडू पाटील मिरज यांच्या हस्ते कामगार भवन महात्मा गांधी रोड सांगली येथे प्रदान करण्यात आला. 

त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार सौ. गीता ठाकर यांना प्रदान करण्यात आला. श्रीफळ, गुलाबपुष्प,शॉल आणि सन्मान चिन्ह असे



पुरस्काराचे स्वरूप होते.याप्रसंगी विविध महिला संघटना सांगली जिल्हा अध्यक्षा ॲड. तेजस्विनी सूर्यवंशी, ॲड अजित सूर्यवंशी, रत्नाकर गोंधळी,शुभांगी जगताप,रुपाली मुळीक,स्नेहल सूर्यवंशी,

अश्विनी माळी यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सदरचा मानाचा पुरस्कार सौ.प्रभाताई सूर्यवंशी यांनी सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये जे मोलाचे काम केले, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी देण्यात येत असतो. 

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ .दीपांजली कडू पाटील मिरज यांनी बदलती जीवनशैली' आणि मेंदूविकार या विषयावर उपस्थितांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.

पुरस्कार प्राप्त सी. लुसी कुरियन यांनीही मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल सूर्यवंशी, स्वागत व प्रस्ताविक ॲड. तेजस्विनी सूर्यवंशी यांनी केले.

सौ. प्रभाताई सूर्यवंशी प्रतिष्ठानच्या ॲड. तेजस्विनी सूर्यवंशी यांनी पुरस्काराचे महत्त्व व आंतरराष्ट्रीय महिला दिन याबाबत माहिती प्रास्ताविकात सांगितली.

Post a Comment

0 Comments