Type Here to Get Search Results !

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक अखेर बिनविरोध नाहीच ! सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक अखेर बिनविरोध नाहीच ! सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात



राहुरी ( प्रतिनिधी )

अखेर अनपेक्षित अशा राहुरी विधानसभा मतदार संघासाठी ट्विस्ट पहावयास मिळाला .

 

बिनविरोध होणार अशी चर्चा असताना अखेर राहुरीची पोट निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले .

 विधानसभेच्या राहुरीच्या जागेसाठी तीन राजकीय पक्षांसह चार अपक्ष असे सात उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहिले आहेत .

बारामती व राहुरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या चर्चा व त्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण प्रयत्न झाले . मात्र अनेक राजकीय घडामोडी घडल्यानंतर दुपारी बारामती , राहुरी विधानसभा पोट निवडणूक  बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे .

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार असे -

अक्षय शिवाजीराव कर्डिले ( भाजपा ) , 

मोकाटे गोविंद खंडू ( राष्ट्रवादी शरद पवार पक्ष )

चोळके संतोष एकनाथ ( वंचित बहुजन आघाडी )

अथर्व म्हसे ( अपक्ष )

 रावसाहेब खेवरे ( अपक्ष )

 सूर्यभान लांबे (अपक्ष )

हापसे महेश (अपक्ष )

    राहुरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध न झाल्याने आता पुढील राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत . राहुरीकरांना 1998 नंतर पुन्हा एकदा पोटनिवडणूक पहावयास मिळत आहे .

Post a Comment

0 Comments