भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत नगर जिल्ह्यातील चौघे ; पहा कोण ते....
राहुरी ( प्रतिनिधी )
राज्यातील राहुरी , बारामती निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांमध्ये नगर जिल्ह्यातील चार मान्यवरांचा समावेश आहे .
येत्या 23 एप्रिल रोजी राहुरी आणि बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे . यासाठी भारतीय जनता पक्षाने राज्यातील 40 नेत्यांची स्टार प्रचारक म्हणून जाहीर केले आहेत . यात प्रामुख्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण , केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह 40 जणांची यादी जाहीर केली असून नगर जिल्ह्यातील नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे , माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार मोनिकाताई राजळे यांचा समावेश आहे .
येत्या 23 एप्रिल रोजी राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत असून कै. शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले हे भाजपाच्या वतीने निवडणूक रिंगणात उभे राहिले आहे .


Post a Comment
0 Comments