Type Here to Get Search Results !

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक - ते आले... त्यांनी विनंती केली, चर्चा केली .... राहुरीकरांना पहावयास मिळाला मोठा ट्विस्ट

 राहुरी विधानसभा पोटनिवडणूक - ते आले... त्यांनी विनंती केली, चर्चा केली .... राहुरीकरांना पहावयास मिळाला मोठा ट्विस्ट


राहुरी ( प्रतिनिधी )

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राहुरीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला .

          माजी मंत्री प्राजक्त तनपुरे अपक्ष अर्ज भरणार असल्याची चर्चा जोरदार चर्चा असतानाच आज सकाळी राहुरीतील प्राजक्त तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण , अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आपल्या लवाजम्यासह कार्यालयात दाखल झाले .



             यावेळी तनपुरे यांनी त्यांचे स्वागत करत आपल्या दालनामध्ये पाऊण तास विविध विषयांवर चर्चा केली .यावेळी मोठ्या संख्येने संपर्क कार्यालयात व कार्यालयाबाहेर तनपुरे समर्थकांची गर्दी झाली होती .



             या वेळी अनेक खलबते झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले की , तनपुरे कुटुंबीयांचे परिसरात मोठे वलय असून चांगला लोकप्रतिनिधी त्यांच्या परिवाराला लाभला आहे . पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झालेले असून मतदार संघाच्या दृष्टीने आम्ही तनपुरे यांना विनंती केली आहे . प्राजक्त तनपुरे व त्यांचे सहकारी कार्यकर्त्यांना विनंती आहे की , महायुतीचे सरकार प्राजक्त तनपुरे यांच्याबरोबर आहे . ते जे म्हणतील त्या विकासात्मक बाबत व त्यांच्या मागण्यांबाबत महायुती सरकार सकारात्मक राहून सहकार्य करेल . 



      [ मोरया स्पोर्टस - राहुरी . प्रो.प्रा. कृष्णा वाडेकर ]

तसेच डॉ . तनपुरे कारखान्याबाबत जो प्रस्ताव आलेला आहे , त्यावर मीच प्रमुख असलेले पार्लमेंटरी बोर्ड विचार करते . त्यामुळे याबाबतही सकारात्मक विचार केला जाईल . पुढील निर्णय प्राजक्त तनपुरे यांच्यावर सोडला आहे , असे म्हणून श्री चव्हाण व पालकमंत्री विखे पाटील पुढील दौऱ्यासाठी संपर्क कार्यालयातून रवाना झाले .

Post a Comment

0 Comments