राहुरी विधानसभा पोटनिवडणूक - महाविकास आघाडी उतरली रिंगणात: गोविंद मोकाटेंचा अर्ज दाखल
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा सस्पेन्स आता उलगडत आलेला असताना आज महाविकास आघाडीचे घटक असलेले माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतली
असतानाच महाविकास आघाडीच्या वतीने राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीसाठी श्री. गोविंद खंडू मोकाटे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे राहुरी ची पोटनिवडणूक राज्यात चर्चेत आली आहे .
आज राहुरी येथील तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला . यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप वर्पे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख श्री. राजेंद्र दळवी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष श्री. बाळासाहेब आढाव व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे पाथर्डी तालुकाध्यक्ष श्री. शिवशंकर राजळे यांच्यासह महाविकास आघाडीचे इतरही पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments