Type Here to Get Search Results !

बेपत्ता 109 मुलींचा लागला शोध ! या पोलीस निरीक्षकाचा मोठा सन्मान पण केला जनतेला समर्पित !!

 बेपत्ता 109 मुलींचा लागला शोध ! या पोलीस निरीक्षकाचा मोठा सन्मान पण केला जनतेला समर्पित !!



सतर्क ( विशेष वृत्त )

 राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे कडून त्यांना मिळालेला पुरस्कार पोलीस स्टेशनचे अंमलदार यांचे टीम वर्कला व वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शन व अहिल्यानगर जिल्ह्यातील सकारात्मक पत्रकारितेला समर्पित केला आहे .



 राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजयजी ठेंगे यांच्या कार्याची दखल घेऊन दैनिक पुण्यनगरी 





अहिल्या नगर जिल्हा यांच्या मार्फत देण्यात येणारा द हिरोज ऑफ अहिल्यानगर सन 2026 चा पुरस्कार यांना रविवारी उत्साहात शिर्डी येथे देण्यात आला . 



ऑपरेशन मुस्कान अभियाना अंतर्गत राहुरी पोलिसांकडून तब्बल 109 मुलींचा शोध घेऊन पालकांच्या ताब्यात दिले आहे . या कार्याची दखल घेऊन पुण्यनगरी या वृत्त समूहाने महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश व बीजमाता व पद्मश्री राहिबाई पेरे यांचे हस्ते शिर्डी येथे आयोजित केला .

सदरचा पुरस्कार,राकेश ओला साहेब, सोमनाथ घार्गे साहेब, मुम्मका सुदर्शन साहेब , अप्पर पोलिस अधीक्षक श्री वैभव कलूबर्मे,श्री सोमनाथ वाघचौरे साहेब,डॉ. बसवराज शिवपुजे साहेब,जयदत्त भवर साहेब यांचे मार्गदर्शन, राहुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी- अंमलदार यांचे टीमवर्क तसेच राहुरी तालुका कलाकार मंच , स्नेहालय संस्था अहिल्यानगर, केअर संस्था पुणे यांनी जनजागृती साठी घेतलेला पुढाकार व राहुरी तालुक्यातील शालेय शिक्षक व शिक्षण विभाग तसेच राहुरी तालुक्यातील पोलीस पाटील यांना मिळालेला पुरस्कार समर्पित केला आहे.

  राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या या कार्याची दखल घेत पुण्यनगरीने दिलेल्या पुरस्काराबाबत सर्वत्र अभिनंदन याचा वर्षाव होत आहे . मात्र आणखी अनेक सामाजिक बाबतीत पोलीस निरीक्षक ठेंगे व त्यांच्या टीमने लक्ष घालावे , असे जागरूक नागरिकांच्या वतीने आवाहन केले आहे .

Post a Comment

0 Comments