Type Here to Get Search Results !

राज्याचे मुख्यमंत्री रेल्वेने शिर्डीत येणार !! मात्र खाजगी प्रकल्पाचा गवगवा कायम

राज्याचे मुख्यमंत्री रेल्वेने शिर्डीत येणार !! मात्र खाजगी प्रकल्पाचा गवगवा कायम



सतर्क   ( विशेष वृत्त )

 राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिर्डी येथे शनिवारी सकाळी संरक्षण उत्पादनाच्या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्याला येणार आहेत . मुख्यमंत्री फडणवीस रेल्वेने येणार आहेत .




       ते रेल्वेने येत असले तरी या खाजगी उत्पादन कंपनीला चालवायला दिलेल्या संरक्षण उत्पादनाच्या  प्रकल्प लोकार्पण सोहळ्याचे मात्र भरभरून कौतुक केले जात आहे . 



     संबंधित यंत्रणा व मान्यवरांकडून याचा मोठ्या प्रमाणात लाखो रुपये खर्च करून प्रसिद्धी व गवगवा केला जात असल्याने याची मात्र जोरदार चर्चा सुरू आहे . एकीकडे मुख्यमंत्री खर्च वाचवत आहेत तर दुसरीकडे संबंधित यंत्रणा खाजगी यंत्रणेच्या माध्यमातून खर्चाला कुठे कमी पाडायला नको याकडे लक्ष देऊन असल्याचे शिर्डी व जिल्ह्यात चर्चिले जात आहे .



 विशेषतः मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी यंत्रणेचा वापर करून लाखो रुपयांचा खर्च केले केली जात असल्याचेही चर्चिली जात आहे .खाजगी कंपनीला चालवायला दिलेला प्रकार पण सोहळ्यासाठी शासकीय यंत्रणा मात्र शासनाचा मोठ्या प्रमाणात खर्च देखील करत असल्याचे विरोधाकांकडून बोलले जात आहे हे विशेष आहे .



बातमी ......

नगर जिल्ह्यात कंत्राटी आणि खाजगी औद्योगिक आणखी एक प्रकल्प

 जिल्ह्याला काय होणार फायदा ?

सतर्क   ( विशेष वृत )

 शिर्डी येथे कार्यान्वित होत असलेल्या निबी ग्रुपच्या संरक्षण उत्पादनाच्या प्रकल्प लोकार्पण होत आहे . शिर्डी औद्योगिक वसाहत  कार्यान्वित होत असलेल्या निबे ग्रुपच्या अत्याधुनिक संरक्षण उत्पादन प्रकल्पाचे लोकार्पण देशाचे संरक्षण मंत्री मा.श्री. राजनाथ सिंह जी यांच्या शुभहस्ते तसेच मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. 

अहिल्यानगर जिल्ह्याच्या औद्योगिक, आर्थिक आणि रोजगारवाढीच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. संरक्षण साहित्य उत्पादन क्षेत्रात जिल्ह्याची स्वतंत्र आणि भक्कम ओळख निर्माण करण्यास या प्रकल्पामुळे मोठी चालना मिळणार असून “मेक इन इंडिया” आणि “आत्मनिर्भर भारत” या संकल्पनांना बळकटी मिळणार आहे. 

अहिल्या नगर जिल्ह्यात यापूर्वी अशाच पद्धतीने

विशेष म्हणजे, या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे दोन हजार युवकांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून भविष्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढून स्थानिक उद्योग, पूरक व्यवसाय आणि आर्थिक विकासाला गती मिळणार आहे.


प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त संरक्षण उत्पादन क्षेत्रातील विविध नामांकित कंपन्यांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्वदेशी उत्पादन क्षमता आणि औद्योगिक नवसंकल्पनांचे दर्शन घडविणारे १०० हून अधिक MSME उत्पादनाचे स्टॉल्स या प्रदर्शनात उभारण्यात आले आहेत. यामुळे स्थानिक उद्योजक, युवक आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित घटकांना संरक्षण उत्पादन क्षेत्रातील नव्या संधी आणि तंत्रज्ञान जवळून अनुभवण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.


हा प्रकल्प केवळ औद्योगिक विकासाचा टप्पा नसून अहिल्यानगर जिल्ह्याला राष्ट्रीय संरक्षण उत्पादन क्षेत्राच्या नकाशावर ठळकपणे स्थान मिळवून देणारा महत्वाकांक्षी उपक्रम ठरणार आहे.


Post a Comment

0 Comments