मंडप वाल्याच्या मुलीची झाली पोलीस दलात निवड... पहा तर मग
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी येथील मंडप व्यवसायिक पेंटर सोनार मंडपवाले म्हणून प्रसिद्ध असलेले श्री.अर्जुन गजानन बुऱ्हाडे यांची मुलगी
कु.वृषाली बुऱ्हाडे हिचे महाराष्ट्र पोलीस दलाच्या पुणे शहर चालक व सोबतच मुंबई शहर पोलीस अशा दोन्ही ठिकाणी एकाच वेळेस निवड झाल्याबद्दल शहरातील विद्यामंदिर प्रशाला येथे सत्कार सोहळा आयोजित केला होता.
तत्पूर्वी शहरातील शनी मंदिर ते कार्यक्रम स्थळापर्यंत वृषालीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा उषाताई तनपुरे- माजी नगराध्यक्ष राहुरी या होत्या. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष
मेजर राजेंद्र कडू पाटील होते.
तसेच राहुरी शहराचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे सर,जामखेड नगराध्यक्ष सौ पुनम चिंतामणी, विद्या मंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक
श्री. कैलास अनाप सर, सुजाताई अरुणसाहेब तनपुरे, हर्ष तनपुरे, राहुरी नगरपालिकेचे
उपनगराध्यक्ष श्री गजानन सातभाई, नगरसेवक डॉ. संतोष उदावंत, राहुरीचे माजी नगरसेवक किशोर जाधव सर, सुवर्णकार समाज राहुरीचे अध्यक्ष बंडूशेठ उदावंत, बाबळेश्वरचे उपसरपंच राहुल डहाळे मंचावर उपस्थित होते.
प्रस्तावना मंगेश बुऱ्हाडे यांनी केली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरूभाऊ सहदेव यांनी केले. शेवटी आभार अंजली नागरे यांनी मांनले.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाज बांधव, मित्रमंडळी,पाहुणे उपस्थित होते. राहुरी तालुका मंडप असोसिएशन, राहुरी तालुका सुवर्णकार समाज, सर्व नगरसेवक यांच्याकडून वृषाली चा सत्कार करण्यात आला. सर्व मान्यवरांसह श्री रवींद्र घनवट यांनी वृषालीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमानंतर अल्पोपहाराचे नियोजन करण्यात आले होते.






Post a Comment
0 Comments