राहुरी शहराच्या दुरावस्थेबाबत ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटणार- दादा पाटील सोनवणे
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी शहराच्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली असून कुलकर्णी हॉस्पीटल ते शुक्लेश्वर चौक या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून नागरिकांना रस्त्याने चालणे मुश्कील झाले आहे . हा रस्ता व्हावा या साठी राहुरी नगर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे यांनी विशेष प्रयत्न करुन स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून या रस्त्यासाठी निधी मंजूर केला होता . परंतु स्थानिक काही लोकांनी या कामाला विरोध करुन काम होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाला पत्र दिले .
आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी शहरातील काही रस्त्याच्या कामासाठी विशेष निधी मंजूर केला होता . या कामातील काही रस्त्यांची कामे झाली यात शुक्लेश्वर चौक ते कानिफनाथ चौक या रस्त्यांचे काम पूर्ण झाले . कुलकर्णी हॉस्पीटल ते शुक्लेश्वर चौक या भागातील व्यापारी,ग्राहक, नागरिक यांच्या मागणीनुसार हा रस्ता व्हावा म्हणून राहुरी नगर पालिकेचे विरोधीपक्षनेते दादा पाटील सोनवणे यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कडे विशेष प्रयत्न केले .
जिल्ह्याचे पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी या कामी लक्ष घालून व्यापारी वर्गाच्या दुष्टीने महत्वाचा असणाऱ्या या कामासाठी मोठा निधी मंजूर केला . परंतु काही या भागातील काही लोकांनी या रस्त्याचे कामाला विरोध दर्शविला भुमिगत गटारीचे काम आता पूर्ण झाले आहे . हा रस्ता होणे गरजेचे आहे आताचं नागरिकांना या रस्त्याने चालणे मुश्कील झाले आहे.पावसाळ्या पूर्वीच हा रस्ता होणे गरजेचे असून विरोधासाठी विरोध न करता हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे .
राहुरी शहरातील सर्वच अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे अपूर्ण कामे मार्गी लावण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील,माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील, आमदार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार असल्याचे दादा पाटील सोनवणे यांनी सांगितले .
शहराच्या विकासासाठी भविष्यात महायुती सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास निधी आणून स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी शहराच्या विकासाचे पाहीलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी युवा आमदार अक्षय कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली शहरातील भाजपाचे आजी माजी नगरसेवक प्रयत्नशील असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.
राहुरी शहरातील अनेक विकासाची कामे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत चाळीस वर्षे नगर पालिकेची सत्ता ताब्यात असताना सत्ताधारी गटाला नागरिकांच्या आणी व्यापारी वर्गाच्या मुलभूत गरजा सोडविण्यात अपयश आले आहे डिसेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत मतदारांनी सताधारी गटाला परत सत्तेत बसवले नवी पेठ मधील गणपती मंदिर ते शनीमंदिरा पर्यंत असलेल्या दुकान गाळ्यात पावसाळ्यात पाणी जाऊन त्यांच्या मालाचे नुकसान गेली अनेक वर्षांपासून होतं आहे तो मार्गी लावणे अत्यंत गरजेचे आहे आगामी काळात महायुती सरकारच्या माध्यमातून पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असून लवकरच शहरातील भाजपा पदाधिकार्याचे शिष्टमंडळ पालकमंत्र्यांना भेटणार असल्याचे दादा पाटील सोनवणे यांनी सांगितले


Post a Comment
0 Comments