इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेल्या जहाजातील राहुरीच्या तरुणीची थरारक कहानी
राहुरी ( प्रतिनिधी )
इराण व अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीत जहाजावर कार्यरत असलेली राहुरी ची तरुणी तेजस्विनी अक्षय खैरे गेल्या तीन महिन्या पासून युद्ध संकटात अडकलेली होती.
युद्धजन्य परिस्थिती, समुद्रातील वाढलेला तणाव आणि सततची भीती यामुळे खैरे कुटुंबीयांमध्ये तेजस्विनी बाबत काळजी वाटत होती.
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका व इस्राइलने इराणवर केलेल्या संयुक्त लष्करी हल्ल्यामुळे इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी मारले गेले.
याला प्रत्युत्तर म्हणून इराणने अमेरिकन तळावर हल्ले करत महत्त्वाच्या होर्मुझची समुद्रधुनी हा व्यापारी जलमार्ग ठेवला. सी एम ए, सी जी एम मॅनअस ही फ्रान्सच्या सी एम ए, सी जी एम या आंतरराष्ट्रीय कंपनीची मालवाहू कंटेनरशिप आहे. जी भारताच्या ध्वजाखाली प्रवास करते. २८ फेब्रुवारीच्या माहितीनुसार हे जहाज संयुक्त अरब आमीरातीच्या खली का बंदरातून निघून अमेरिकेतील ऑरेंज या बंदराच्या दिशेने प्रवास करत होते. अवघ्या काही मिनिटांचा प्रवास बाकी असताना अमेरिका व इराण युद्धामुळे जलमार्ग रोखून ठेवले गेले.
जहाजावरील युद्धाच्या काळात होर्मुझच्या समुद्रधुनीत अडकल्यामुळे भीषण अनुभव सांगताना अंगावर शहारे येत होते. सातत्याने क्षेपणास्त्र हल्ले तसेच ड्रोन हल्ल्याचा धोका वाटत होता. ज्यामुळे जहाजावरील लाईट बंद ठेऊन तसेच टॅकर बंद करून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला जात होता. इराणी क्षेपणास्त्रांचा जहाजावरील हल्ला डोळ्या समोर घडतानाचा थरारक अनुभव होता. डोळ्यासमोर युद्धाची धग, मनात सतत भिती अशा परिस्थितीत तेजस्विनी खैरे हिने धैर्य ठेवल्याने तीला सुखरुप घरी आणले.
सर्वांच्या प्रार्थना व तीच्या धैर्यामुळे मायदेशी सुखरुप पाऊल ठेवल्या नंतर खैरे कुटुंबीय व मित्र आप्तेष्टां कडून प्रचंड आनंद व समाधान व्यक्त केले. या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी भारतीय नौदल डिरेक्टरेट जनरल ऑफ शिपींग आणि व्यवस्थापन कंपन्यांचे देखील आभार मानले. कित्येक आठवडे समुद्रात अत्यंत तणावाखाली घालवल्यानंतर जेव्हा तेजस्वीनी आपल्या कुटुंबीयांना भेटली, तेव्हा तो क्षण अत्यंत भावनिक होता. युद्धजन्य परिस्थिती आणि भयानक संकटातून सुखरुप बाहेर पडून आल्यानंतर दुसरा जन्म तीला मिळाला. म्हणून कुटुंबीयांनी आनंद व्यक्त करत सुटकेचा श्वास सोडला. परिसरातही तीच्या सुखरुप पुनरागमना बद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. कठीण परिस्थितीत तेजस्वीनी हिने धैर्य व संयम राखत स्वतःची जबाबदारी पार पाडली. तीच्या या संघर्षमय प्रवासामुळे अनेकांना प्रेरणा मिळत असून संकट कितीही मोठं असलं तरी धैर्य आणि विश्वास कायम ठेवला तर त्यातून मार्ग नक्कीच निघतो. असा संदेश तीच्या अनुभवातून समोर आला.



Post a Comment
0 Comments