Type Here to Get Search Results !

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळीच नगर जिल्ह्यात .... पहा कोठे ते !!

 राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळीच नगर जिल्ह्यात .... पहा कोठे ते  !!



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन



अहिल्यानगर  ( प्रतिनिधी )

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त चौंडी (ता.जामखेड) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही अभिवादन केले.


याप्रसंगी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे आदी उपस्थित होते.


याप्रसंगी मुख्यमंत्र्यांसह उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक येथे जाऊन दर्शन घेतले. 


#अहिल्यादेवीजयंती #AhilyadeviJayanti2026 #अहिल्यानगर #Ahilyanagar #श्रीक्षेत्रचोंडी

Post a Comment

0 Comments