अवैध ड्रोनचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज.... पहा मध्यरात्रीचे वृत्त
सतर्क ( विशेष वृत्त )
रविवार दि. ३१ मे च्या रात्री ११ ते १२ वा. दरम्यान देवळाली प्रवरा , लाख , त्रिंबकपूर रस्त्यावर
राहुरीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे साहेब यांचे सोबत पुणे येथुन आलेले अँटी ड्रोन गण पथकाने ड्रोन पाडण्याचा प्रयत्न केला..
तथापि ड्रोन ची उंची जास्त असल्याने आज या पथकाला यश येऊ शकले नाही..
पोलिस निरीक्षक संजय ठेंगे साहेब व त्यांच्या पोलिस पथकाने केलेल्या आजच्या प्रयत्नाने नागरिक समाधानी असून किमान हे ड्रोन
आणि चोर यांचा काही संबंध नसावा या निष्कर्षाप्रत नागरिक येवून ठेपले आहेत.. रविवारी रात्री जवळपास १० ड्रोन या पोलिस पथकासह स्थानिक नागरिकांनी पाहिले. उद्या रात्री पुन्हा वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करणेत येतील असे समजते.
प्रसंगी या पोलिस पथकास मदत करण्यासाठी देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस, पत्रकार शिवाजी घाडगे यांचेसह अनेक स्थानिक नागरिक मध्यरात्री पर्यंत उपस्थित होते.
पुणे येथुन आलेले अँटी ड्रोन गन चे गण मॅन संदीप जगताप यांचेसह पोलिस निरीक्षक संजय ठेंगे साहेब तसेच राहुरी येथून आलेल्या सर्व पोलिस पथकाचे पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह देवळाली प्रवरा शहरवाशियांच्या वतिने समाधान व्यक्त केले जात आहे .



Post a Comment
0 Comments