Type Here to Get Search Results !

नगर जिल्ह्यातील या धरणाचा पाणीसाठा आला निम्म्याच्या खाली

 नगर जिल्ह्यातील या धरणाचा पाणी साठा आला निम्म्याच्या खाली



सतर्क ( विशेष वृत्त )

 नगर जिल्ह्यातील सर्वाधिक क्षमता असणाऱ्या मुळा धरणाचा साठा मे महिन्यात 50% पेक्षा कमी झाला आहे . सध्या धरणाच्या उजव्या कालव्याचे शेतीचे उन्हाळी आवर्तन सुरू आहे .



 पुढील महिनाभर हे आवर्तन चालेल . यंदाच्या वर्षी पावसाने चांगली कामगिरी केल्यामुळे नगर जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठे होते . त्यानंतर जानेवारी महिन्यात काही ठिकाणी शेतीसाठी आवर्तन द्यावे लागले . साधारणतः धरणातील पाणीसाठे एप्रिल महिन्यातच निम्म्याच्या खाली येतात . 

मात्र यंदाच्या वर्षी समाधानकारक पाणीसाठा राहिल्याने आज पाच मे 2026 ला मुळा धरणाचा पाणीसाठा 50% पेक्षा कमी झाला असून पुढील पावसाळ्यापर्यंत पाणीसाठ्याची चांगली परिस्थिती असू शकते , असा अंदाज आहे . 

सध्या मुळा धरणातून उजव्या कालव्याद्वारे राहुरी नेवासा पाथर्डी शेवगाव या तालुक्यातील शेती सिंचनाचे आवर्तन सुरू असून हे आवर्तन महिनाभर चालेल . यात चार टीएमसी पाणी खर्च होण्याची शक्यता आहे . आज अखेर मुळा धरणात 12 हजार 837 दशलक्ष घनफूट ( 49.37% ) पाणीसाठा असून आठ हजार 337 दशलक्ष घनफूट ( 38 टक्के ) उपयुक्त पाणीसाठा असून धरणाच्या उजवा कालव्याद्वारे 1 हजार 500 क्यूसेकने शेतीचे आवर्तन सुरू आहे . मुळा धरणाच्या अधिकाऱ्यांना अधिक चौकशीसाठी संपर्क केला असता कोणाचाही संपर्क होऊ शकला नाही .

Post a Comment

0 Comments