Type Here to Get Search Results !

राहुरी तालुका वकील संघाचे अध्यक्षपदी ॲड डी आर तोडमल यांची बिनविरोध निवड

राहुरी तालुका वकील संघाचे अध्यक्षपदी ॲड डी आर तोडमल यांची बिनविरोध निवड



राहुरी ( प्रतिनिधी ) 

राहुरी तालुका वकील संघाचे 2026/2027 करीता निवडणुक नुकतीच झाली असुन ॲड तोडमल डी आर हे बिनविरोध निवडुन आले . तसेच उपाध्यक्ष पदी ॲड प्रकाश मारुती संसारे हे निवडुन आले तसेच महिला उपाध्यक्ष म्हणुन ॲड जयश्री दत्तात्रय घावटे याही निवडुन आल्या .

तसेच सचीव पदी ॲड शशीकांत गजानन देशमुख यांची बिनविरोध निवड झाली . त्याचप्रमाणे सहसचिव म्हणुन ॲड राहुल दिवे, खजिनदार पदी ॲड असीफ शेख, सह खजिनदार पदी ॲड दिपक सगळगिळे तसेच सदस्य म्हणुन ॲड विशाल फिलीफ संसारे, ॲड मनोज दत्तात्रय पारखे, ॲड नवेद एकबाल बागवान, ॲड सुरेखा विजय कुलकर्णी, ॲड विद्या बाळकृष्ण अनाप, ॲड अनिता बाळासाहेब तोडमल यांची निवड झालेली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जेष्ठ सदस्य ॲड बी बी उऱ्हे यांनी कामकाज पाहिले . त्यांना ॲड पागिरे यांनी सहकार्य केले.

 या निवडी प्रसंगी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व राहुरी तालुका वकील संघाचे सर्व जेष्ठ सदस्य व ज्युनियर सदस्यही उपस्थित होते. नुतन पदाधिकाऱ्यांचे जेष्ठ सदस्यांनी, सर्वांनी अभिनंदन केले. सत्कार प्रसंगी बोलतांना अध्यक्ष म्हणुन डी आर तोडमल यांनी राहुरी येथे जिल्हा व सत्र न्यायालय आणणे कामी, नुतन इमारत बांधण्यासाठी व वकीलांच्या प्रश्नासाठी काम करणार असल्याचे सांगितले. वरील निवडणुक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आहे. नुतन पदाधिकाऱ्यांचे जेष्ठ सदस्य ॲड आर जे म्हसे, ॲड आर एम उंडे, माजी अध्यक्ष ॲड मोरे, ॲड नवले, ॲड आघाव, ॲड पवार ॲड देशमुख, ॲड भिंगारदे, ॲड रसाळ ईत्यादींनी अभिनंदन केले. 

नुतन अध्यक्ष-डी आर तोडमल

Post a Comment

0 Comments